दोघा नगरसेवकांचा पोलिसांवर हल्ला 4 अटकेत

येथील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांच्या भावाच्या कारचा अपघात झाला. यावेळी आरोटे व भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी दाखल जालेले होते. यावेळी संशयित आरोटे व दोंदे यांनी कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी विष्णू गावित यांना धक्काबुक्की करून बेदम मारहाण करत गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२८) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि.२९) सकाळी दोघा संशयित नगरसेवकांना अटक केली आहे.

शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांच्या भावाच्या कारचा अपघात झाला. यावेळी आरोटे व भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी दाखल जालेले होते. यावेळी संशयित आरोटे व दोंदे यांनी कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी विष्णू गावित यांना धक्काबुक्की करून बेदम मारहाण करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी पोलिसांनी दोघा संशयित नगरसेवकांना अटक केली आहे.


दरम्यान, अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या संतापजनक घटनेचा शहर व परिसरातून निषेध व्यक्त होत आहे. अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे निरिक्षक कमलाकर जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्यात आरोटे व दोंदे यांच्यासह अमित आरोटे, अजय मिश्रा यांना अटक केली आहे. याप्रकरणी बीट मार्शल गावीत यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात आरोटे, दोंदे यांच्यासह सात संशयित हल्लेखोरांविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ, दमबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.