नाशिक पालिकेचा स्पीलओव्हर शून्यावर! मुंढेंच्या त्रिसूत्रीनुसार कामे रद्द केल्याचा परिणाम

मनपाची आर्थिक स्थिती सुधारणेच्या मार्गावर…

नाशिक : महापालिका अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गरज, तांत्रिक व्यवहार्यता आणि तरतूद या त्रिसूत्रीतून मागील सर्व कामांना तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावल्यामुळे अाता ६५० काेटींचे दायित्व अर्थात स्पीलअाेव्हर शून्यावर अाले अाहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अभियानासाठी महापालिकेचा ५० कोटींचा हिस्सा स्मार्ट सिटी कंपनीला दिल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत १२५ कोटी रुपये शिल्लक राहिल्याचेही समोर आले आहे. Tukaram Mundhe work pattern nmc spillover

या खर्चांना मुंढे यांनी लावला लगाम :

  • नाशिक भाजप नगरसेवकांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली २५७ कोटींची रस्ते विकास योजना रद्द केली.
  • नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाखांच्या विकास निधीचा पायंडा माेडीत.
  • विविध समित्यांवर मंजूर मात्र निविदा न निघालेली अतिरिक्त खर्चाची कामे रद्द.
  • अधिक दराने दिलेली काही कार्यादेश दिलेली कामेही रद्द करण्याचा निर्णय.
  • रस्त्यांवर डांबराचा स्तर लावणे, ग्रीन जिम, योग हॉल यांसारख्या नगरसेवकांच्या आवडत्या कामांवर फुली.
  • ड्रेनेज, पाणीपुरवठा, वीज इत्यादी अत्यावश्यक कामांना प्राधान्य
  • ठेकेदारांना थेट बँकेमार्फत देयके

मुंढे यांनी अार्थिक शिस्त लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठविल्याचे सांगितल्यानंतर भाजपच्या सत्ता मिळाल्यानंतरच्या १ वर्षाच्या अनागोंदी कारभाराला चाप लावला आहे. सत्ताधारी नगरसेवकांची सर्वाधिक कोंडीसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचीही मुंढे यांच्यामुळे झाली आहे. Tukaram Mundhe work pattern nmc spillover

त्याचा परिणाम म्हणून अाता महापालिकेचे जुन्या कामांचे दायित्वच नष्ट झाले असून स्पील अाेव्हरचा अाकडा शुन्यावर अाला अाहे. Tukaram Mundhe work pattern nmc spillover

सद्यस्थितीत महापालिकेला जीएसटीपोटी मिळालेले ७२ कोटींचे अनुदान, घरपट्टी, पाणीपट्टी, विकास शुल्क आदी माध्यमातून दोन महिन्यात महसूल मिळाला अाहे. त्यात खर्च जाऊन सुमारे १२५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

Tukaram Mundhe work pattern nmc spillover

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.