वनी धाडीला तुका’राम’; मुंढेंची अखेर बदली, राधाकृष्ण गमे नवे आयुक्त

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाल्याच्या चर्चेवर अखेल शिक्कामोर्तब झाले असून त्यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र याबाबत काहीही माहित नसून बदलीचे आदेश प्राप्त झाले नाहीत अशी प्रतिक्रिया मुंढे यांनी दिली आहे. Tukaram-Mundhe transferred

मुन्धेच्या बदलीचा इतिहास बदलला नसून केवळ नऊ महिन्यात नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून नाशिक भाजपा नगरसेवकांचा एक गट मुंढे यांच्या बदलीसाठी सेटिंग लावत असल्याच्या चर्चा होत्या.

बुधवारी (दि. 21) दिवसभर मुंढे यांच्या बदलीच्या चर्चा आणि मेसेज समाज माध्यमांत फिरत होते. बदलीचा पहिला संशय भाजप नगरसेवकांवरच होता. त्यामुळे विचारणाही त्यांनाच सुरु झाली. समाज माध्यमांत फिरणारा मेसेज भाजपच्याच गोटातून बाहेर आल्याच्याही चर्चा शहरात रंगल्या आहेत.

शिस्तबद्ध सनदी अधिकारी अशी प्रतिमा असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या येण्याने नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र होते. अनेक नियमबाह्य आणि अनावश्यक कामांना त्यांनी कात्री लावल्याने सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांत असंतोष होता.

एकावेळी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्या इतपत सत्ताफ्धारी भाजप नगरसेवकांनी प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो प्रस्ताव मागे घेण्यास लावला. अगदीच अलीकडील घटनेबद्दल बोलायचे झाल्यास तुकाराम मुंढे यांनी नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू गार्डनचे लोकार्पण परस्पर केले होते. मात्र नाशिकच्या स्थानिक नेत्यांना त्याचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करायचे असल्याने थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र मुंढे यांनी परस्पर निर्णय घेत गार्डन नागरिकांसाठी खुले केले. आता मात्र मुंढे यांच्या कार्यशैलीचा ‘झटका’ पालकमंत्र्यांना बसल्याने मुंढे यांच्या बदलीची तडक कारवाई मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आल्याची चर्चा आहे.

मुंढेना बदललं आता आम्ही तुम्हाला बदलू :

या बदलीबाबत नाशिककरांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. नाशिकमधील भाजपा आमदारांनी मोठ्ठी फिल्डिंग मुंढे यांची बदली होण्यासाठी लावली होती असा आरोप करत प्रहार जनशक्तीचे दत्तू बोडके यांनी तुम्ही मुंढेना बदलले आता आम्ही तुम्हाला बदलवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. याचवेळी काही नाशिककरांनी तुकाराम मुंढे यांच्या बदली झाल्याने समाधान! व्यक्त केले आहे.

आमच्या फेसबुक पेज वर नाशिककरांच्या प्रतिक्रिया तुम्ही वाचू शकता. इथे तुम्हीही व्यक्त होऊ शकता.

मुंढे यांची २०१६ पासूनची चौथी बदली

२०१६ मध्ये मुदत संपण्यापूर्वी सोलापुरातून नवी मुंबईत बदली.

नवी मुंबई मनपा आयुक्तपदी बदली, मात्र अनधिकृत बांधकामविरोधात मोहीम उघडल्यामुळे सर्वपक्षीयांच्या प्रयत्नातून पुणे येथे बदली

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना नेक निर्णयांमुळे पीएमटी फायद्यात आली. मात्र तेथेही काही निर्णयांमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी, तेथून नाशिक मनपा पदी नियुक्ती.

नाशिक मनपात आल्यापासून अनेक नियमबाह्य आणि अनावश्यक कामांना त्यांनी कात्री लावल्याने सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांत असंतोष. पुन्हा बदलीमध्ये परिणीती.

Tukaram-Mundhe transferred

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.