तुकाराम मुंढे यांच्या : नागरिकांना सूचना, अधिरकारी वर्गाला तंबी तर नगरसेवकांना इशारा

नाशिकचा  विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या सोबत चर्चा 

नाशिक : कोणत्याही अधिकाऱ्याने न विचारता आणि शिफारस करत फाईल पुढे आणली तर त्याची गय करणार नाही. सोबतच जर महापालिका कर्मचारी वेळेवर काम करणार नाहीत आणि फिल्डवर जर त्या वेळेत दिसले नाही तर त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरु करण्यात येईल. कोणत्याही नगरसेविकेचा पती जर काम घेवून आला तर त्याचे हे खपवून घेणार नाही , या सोबत नागरिकांना आज मनपा नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक सूचना केल्या आहेत. नाशिकच्या विकास आणि सार्वजनिक वाहतूक साठी मुख्यमंत्री सोबत चर्चा केली आहे . पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी पुढे काय करणार हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. आज संपूर्ण नाशिक शहरात फक्त तुकाराम मुंढे यांची  चर्चा होती.

पदभार स्विकारत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. राजकीय पदाधिका-यांसह कुणाचाही दबाव कर्मचा-यांवर नसेल याची अधिका-यांना ग्वाही देतो. शहरातील कामे मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजीट करत चेक करणार. तर नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रहिवाशांनी कचरा विलगिकरण करावे. ओला,सुका आणि इ कचरा नागरिकांनी वेगळा करायचा आहे. कचरा वर्गीकरण हे मनपाचे काम नाही. असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. पुढे त्यांनी व्यापारी वर्गाला तंबी दिली आहे. मुंढे म्हणाले की दुकानदारांनी   ५० मायक्रोन पेक्षा प्लास्टिक वापर पूर्णपणे बंदी करणार आहे. नागरिकांनी घाण न करून जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. महापालिका कठोरपणे आपले काम करणार आहे. नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाणार आहे. शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल असे मुंढेंनी नाशिककरांना विश्वास  दिला आहे. तर

माझ्याकडे कोणताही नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी शिफारस फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे. त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असा इशारा मुंढेंनी दिला आहे. तर आज झालेल्या अधिकारी वर्गाच्या पहिल्या मिटिंगमध्ये त्यांनी अधिकारी वर्गाला सूचना दिल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी काम करताना संवेदनशीलता दाखवावी. नाशिककरांचे समाधान होईल असे काम मी करेन, असे सांगत तुकाराम मुंढे पुढे म्हणाले शहराचे स्वास्थ्य, पर्यावरण टिकवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. पार्किंगसाठी नवे धोरण आणणार आहोत. शहराचा विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी नमूद केले आहे.

मुख्य मुद्दे :

 • शहराला पूर्ण ऑनलाईन सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार
 • मनपा कामात संवेदनशीलतेसह पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न
 • शहरातील मोडकळीस आलेल्या वाहतुक व्यवस्थेचा अभ्यास करणार
 • माझ्या बदलीबद्दल मी काही बोलणार नाही; चांगले काम करत राहणार
 • शहरात सध्या कोणती कामे होणे गरजेचे आहे. याचा अभ्यास करून खरच ते गरजेचे आहे का? गरजेचे असल्यास त्याला तांत्रिक आणि आर्थिक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करणार
 • डिएसआर रेटच्या वर कोणतेही टेंडर जाणार नाही
 • अधिकाऱ्यांना फक्त एकच सूचना आहे की ज्याचं त्याचं काम त्यानेच करावं, मी कामाच्या गुणवत्तेत कुठेही तडजोड करत नाही.
 • कंत्राटदारांनी फाईल फिरवण्याची कामे करू नयेत.
 • पारदर्शक कामे करावीत, हॅन्की पॅन्की चालणार नाही
 • जो काम चांगले व पारदर्शक करतो त्याला १०० टक्के सुरक्षा आहे.
 • कामात दिरंगाई करतो त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल
 • स्वच्छताही मनातून ठेवता आली पाहिजे, जो कचरा करतो त्यालाच तो साफ करावा असे वाटले पाहिजे

***************************************************************************

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.