मनपा आयुक्त मुंढे अचानक रजेवर, अनेक चर्चांना उधाण, बदलीची शक्यता

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात १५ दिवस सुट्टीचा अर्ज दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे. विदेश दौरा करणार असून त्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली आहे. मात्र नाशिकमध्ये केलेली घरपट्टीवाढ यामुळे राजकीय नेत्यांनी वातवरण तापवले आहे. तर सत्तधारी आमदार सुद्धा मुंढे यांची तक्रार घेवून मुख्यमंत्री यांच्याकडे गेले होते.

विधानपरिषद निवडूक आचार संहिता  असतांना महासभा घेत करवाढीला स्थगिती दिली होती, त्यामुळे महापालिकेच्या अडचणी वाढल्या  आहेत. त्यामुळे नाराज लोकप्रतिनिधी आणि काही प्रमाणत नागरिक याच्या नाराजीमुळेच तर मुंढे यांना रजेवर पाठविले गेले अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत.Tukaram mundhe

holiday politically pressurized transfer nashik  

तर त्या बरोबर त्यांची बदली केली जाणार तर नाहीना अशी शंका सुद्धा उपस्थित केली जात आहे. मुंढे यांची बदली झाली तर सर्वात मोठा धक्का नाशिकच्या नागरिकांना बाद बसणार आहे. राजकीय लाभापायी आणि अनागोंदी काम करणारे मात्र यामुळे आनंदित होणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील होत असलेले बदल पुन्हा एकदा थांबतील, मनपाची सेवा पुन्हा एका काम न करणारी होणार आहे.

आमच्या सोबत जाहिरात करा लाखो नागरिकांन पर्यंत पोहोचा !

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश दिले आहेत. मुंढे यांनी व्यक्तिगत कारणामुळे तसेच विदेश दौºयामुळे ही रजा घेतली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयास पाच दिवसांपूर्वीच कळविले होते.शहरातील करवाढीचा विषय  महिनाभरापासून गाजत आहे. आयुक्तांनी मनपाला सर्व मिळकतींची करवाढ करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी जमिनींचे करमूल्य निर्धारित करण्याची अधिसूचना काढली. या सूचनेवरून शहरात प्रचंड गोंधळ उद्रेकाचे वातावरण तयार झाले होते.

संपूर्ण महापालिका हद्दीवरच कर लावण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी मिळकती आणि भूखंडावर करवाढ केली. मोकळ्या भूखंडांमध्ये शेतीक्षेत्राचा समावेश असल्याने शेतकरी वर्गाने  त्याविरोधात मेळावे घेऊन विरोध सुरू केला. आयुक्तांनी तेव्हा स्पष्ट केले की हरित क्षेत्रातील शेतीवर कर लावला नाही. उलट  नसल्याचा दावा करतानाच करमूल्यातही पन्नास टक्के कपात केली होती. परंतु आता रहिवासी क्षेत्रातच मोठ्या प्रमाणात शेती असल्याने शेतकऱ्यामधील  नाराजी कायम होती. त्यामुळे आमदार सुद्धा नाराज होते त्यात मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रम सुरु केला होता, त्यानंतर ज्या दिवशी तो सुरु होणार होता, त्या दिवशी स्वतः आयुक्त आले आणि व्यक्तिक कारणाने कायक्रम रद्द असे सांगून निघून गेले होता, त्यांतर लगेच ते रजेवर गेले त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आहे आहे. मात्र नाशिकच्या नागरिकांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हवे आहेत. त्यामुळे पंधरा दिवसा नंतर मुख्यमंत्री काय निणर्य घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.