तुकाराम मुंढे यांची राज्याच्या नियोजन विभाग सहसचिव पदी नियुक्ती

Nashik News On Web Latest Updates Marathi Batmya, Tukaram Mundhe appointed joint secretary planning department mantralay mumbai

नाशिक मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली वर शिक्कामोर्तब झाले त्यांची मंत्रालयात महाराष्ट्र प्रशासनाच्या नियोजन विभागाच्या सह सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी तुकाराम मुंढे यांना त्वरित या पदाचा कार्यभार स्वीकारण्याबाबत पत्रात म्हटले आहे. Tukaram Mundhe appointed joint secretary planning department mantralay mumbai

मात्र नाशिकच्या नवीन आयुक्तांचे नाव अजूनही गुलदस्त्यात असून मुंढे यांनी तोपर्यंत नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचे आदेशात म्हटले आहे.

काय असतो नियोजन विभाग?

राज्याच्या वार्षिक नियोजनाचा आराखडा, जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम यासाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा, राज्यपालांच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेली वैधानिक विकास मंडळे यासाठी लागणारी तरतूद, राज्य नियोजन मंडळाच्या अस्थापनेविषयक बाबी, नियोजन विभागाच्या अनाधिस्त असलेल्या योजनांतर्गत बाबींची तरतूद करणे व वितरीत करणे, पर्यवेक्षण करणे आदी नियोजन विभागाची उद्दिष्टे आहेत.

Tukaram Mundhe appointed joint secretary planning department mantralay mumbai
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.