Tryambakeshwar Nashik Murder Breaking त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची भर दिवसा हत्या

Nashik breaking -त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची भर दिवसा हत्या Tryambakeshwar Nashik Murder Breaking

– चाकूने वार करत केला खून भर दिवसा घटना घडल्याने त्र्यंबकेश्वर मध्ये खळबळ

– हत्येचा कारण मात्र अस्पष्ट

– त्र्यंबकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भरदिवसा ही हत्या झाल्याने शहर परिसरात खळबळ उडाली.

नुकतेच त्यांचे जेष्ठ बंधु शिवाजी ऊर्फ शेखर यांचे निधन झाले. सोमवारी त्यांचा दहावा झाला. आज त्यांचा बाराव्याचा कार्यक्रम सुरु होता.  दुपारी बारा वाजेच्या सुमारास तुंगार यांच्या घरी श्राद्ध विधी सुरू होता. त्याचवेळी कुणाचा तरी फोन आला.

त्यानंतर तुंगार हे अहिल्या धरणाकडे गेले. तेथे एका व्यक्तीने तुंगार यांच्यावर हल्ला केला आणि सुरीने त्यांच्या पोटावर वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुंगार यांना सोडून गोंदके नावाचा हा युवक थेट पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला.

याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. Tryambakeshwar Nashik Murder Breaking

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.