नाशिकमध्ये ४० लाखाचा गुटखा जप्त

सातपूर : परराज्यातून छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणण्यात येणारा ४० लाख ४३ हजार ५९२ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथे गुजरातहून नाशिकमध्ये दाखल झालेल्या मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच 0४ सीजी ३६२८) या ठिकाणी आला. ट्रकची तपासणी केली असता संपूर्ण ट्रक गुटख्याने भरलेला आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकार्‍यांनी सापळा रचत ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, बेंडकुळे यांनी ही कारवाई केली. यात २६ लाख ३८ हजार ५९२ रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला २२0 ग्रॅमची १४९९२ पाकीटे, ६ लाख ५८ हजार २४0 रुपये किमतीचा व्ही-१ तंबाखू २७.५ ग्रॅमची १४९६0पाकीटे, ५ लाख ९८ हजार पाचशे साठ रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला १५0 ग्रॅमची ४९८८ पाकीटे व १ लाख ४८ हजार २00 रुपये किमतीची, व्ही-१ तंबाखू १८ ग्रॅमची ४९४0 पाकिटांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे बंदी असताना गुटखा उत्पादन सुरूच असून त्याची विक्रीही होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अगदी टपरीवरही खुलेआम गुटखा विक्री होत असताना या मोठ्या धेंड्यावर कारवाई झाल्याने याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.