वरातीचा ट्रक उलटला दोन ठार अनेक प्रवासी जखमी

नाशिक : नाशिक येथील पाथर्डीफाटा परिसरातून लग्नासाठी  वर्‍हाड  घेऊन घोटीकडे प्रवास करत असलेल्या टेम्पोला  मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदीजवळ उलटला होता. या अपघातात अपघातात दोन ठार तर जवळपास  चाळीस प्रवाशी गंभीर जखमी झाले.

आज दुपारी हा अपघात घडला आहे. सविस्तर वृत्त असे की, पाथर्डीफाटा येथून लग्नाचे  वर्‍हाड  घोटीकडे टेम्पोमधून (एम.एच. डीके २०९०) निघाले. जेव्हा टेप्मो हा महामार्गावरून भरधाव जात होता चालकाचा वालदेवी नदीच्या जवळ गाडीवारीला ताबा सुटला आणि पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस, राज्य शासनाच्या १०८ क्रमांकावर अपात्कालीन सेवा देणा-या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी येत मदत कार्य सुरु केले होते. अपघातात कार्तिक दीपक माळी (वय ५) गोपाळ रमेश पवार (२५) यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकिय रुग्णालयात जखमींवर  उपचार सुरू आहे. याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.