Trailer Girlz बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर Video

‘आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, जग गेले तेल लावत’.असं म्हणणाऱ्या ‘गर्ल्स’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘गर्ल्स’ हा या वर्षातला बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. पहिले गाणे आणि  चित्रपटाचा टिझर पाहून ही उत्सुकता अधिकच वाढली होती. प्रेक्षकांना ज्या ट्रेलरची प्रतीक्षा होती त्या ‘गर्ल्स’ चित्रपटाचा ट्रेलर आल्यामुळे आता ही उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.  Trailer Girlz


मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. ‘दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो’. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हा चित्रपट पाहून आपली आपल्याच आई वडिलांशी नव्याने ओळख होणार आहे. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ सारख्या चित्रपटातून रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे  दिग्दर्शक विशाल देवरुखकर आपल्या हॅट्रिक असणाऱ्या सिनेमातून मुलींच्या खासगी आणि बंदिस्त आयुष्याला सर्वांसमोर आणले आहे. आतापर्यंत मुलींमध्ये होणारे संभाषण, संवाद फारसे कोणाला माहित नव्हते पण आता ‘गर्ल्स’ पाहिल्यानंतर हे ‘गर्ल्स टॉक’ तुम्हाला नक्कीच कळतील.

‘आपल्याला बंदिस्त केलेल्या पिंजऱ्याला तोडायचे आणि आपण स्वतःहून शिरलेल्या पिंजऱ्याला सोडायचे’, आणि आपल्या मनाप्रमाणे आपले आयुष्य एकदातरी  जगत स्वतःला मोकळा श्वास घेऊ द्यायचा.

या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत.  येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. Trailer Girlz

Girlz All Set To Break Free

The much-talked about film Girlz has been in the news ever since its teaser poster launched. The curiosity among the audience further increased with the teaser of the film that hit social media a while ago and now, the makers have released the trailer of Girlz as well.

The response to teaser and poster received have doubled with the trailer which shows the three protagonists, Mati, Rumi and Maggi, living life on their terms. Their approach in life is that one should be confident about oneself and be free.

While the three girls are busy following this motto in their individual lives, they meet each other by chance and get acquainted, understand their approach towards life, bond and end up being good friends. The film, directed by Vishal Sakharam Devrukhkar, promises to be high on entertainment value. ‘Don’t find meaning in friendship. Instead, make the friendship meaningful’- a deep thought like this is conveyed through the film that makes a statement about human relationships. The makers say that this film will change your perspective of looking at your parents and will newly introduce them to you.

पहा हॉट ट्रेलर
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Trailer Girlz बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.