Topchi Army Artillery Deolali : स्कुल ऑफ आर्टीलरीच्या ‘तोपची’ कार्यक्रमात तोफांचा थरार

देवळाली चाल करून येणाऱ्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टीलरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तोपची कार्यक्रमात तोफांचा थरार बघावयास मिळाला. शत्रूचा अचूक वेध घेत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात धडाडणाऱ्या तोफांची सलामी आज बघावयास मिळाली. Topchi Army Artillery Deolali

लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक टाकतीचे दर्शन घडले. लष्कराच्या देवळाली येथील तोफखाना केंद्राचा वार्षिक सराव प्रात्यक्षिक (तोपची) सोहळ्यास आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली.

यादरम्यान, अल्ट्रा लाईट होवित्जर एम-७७७, स्वयंचलित तोफ के-९ वज्र, बोफोर्स, १२० एमएम मोर्टार, १०५ एमएम हलकी तोफ, १५५ एमएम सॉल्टम, १३० एमएम-४६ गन आणि मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर या तोफांचा सहभाग होता.

लेफ्टनंट जनरल अति विशिष्ट सेवा मेडल दिपिंदर सिंह अहुजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच तोफखाना केंद्राचे कमांडन्ट परम विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारीया यांसह वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि वायू सेना, नौसेना, भू दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुरुवातील चेतक, चिता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे जवानांच्या चित्तथरारक कसरती बघावयास मिळाल्या. हलक्या वजनाच्या हेलीकॉप्टरने रेकी करत उपस्थितांना लष्कराची ताकत दाखवली.

View this post on Instagram

#deolali #topchi #NashikOnWeb #armyartillery #armypractice #nashik #नाशिक #देवळाली : स्कुल ऑफ आर्टीलरीच्या 'तोपची' कार्यक्रमात तोफांचा थरार देवळाली – चाल करून येणाऱ्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टीलरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तोपची कार्यक्रमात तोफांचा थरार बघावयास मिळाला. शत्रूचा अचूक वेध घेत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात धडाडणाऱ्या तोफांची सलामी आज बघावयास मिळाली. लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक टाकतीचे दर्शन घडले. लष्कराच्या देवळाली येथील तोफखाना केंद्राचा वार्षिक सराव प्रात्यक्षिक (तोपची) सोहळ्यास आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. यादरम्यान, अल्ट्रा लाईट होवित्जर एम-७७७, स्वयंचलित तोफ के-९ वज्र, बोफोर्स, १२० एमएम मोर्टार, १०५ एमएम हलकी तोफ, १५५ एमएम सॉल्टम, १३० एमएम-४६ गन आणि मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर या तोफांचा सहभाग होता. लेफ्टनंट जनरल अति विशिष्ट सेवा मेडल दिपिंदर सिंह अहुजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच तोफखाना केंद्राचे कमांडन्ट परम विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारीया यांसह वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि वायू सेना, नौसेना, भू दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरुवातील चेतक, चिता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे जवानांच्या चित्तथरारक कसरती बघावयास मिळाल्या. हलक्या वजनाच्या हेलीकॉप्टरने रेकी करत उपस्थितांना लष्कराची ताकत दाखवली. दुरीकडे ध्रुवमधून एजेक्ट करणाऱ्या पायलटसने पराशुटच्या माध्यमातून थेट कार्यक्रमस्थळी हजेरी लावल्याने त्यांचेही उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. #indianarmy #india #indian #army #jaihind #bsf #love #crpf #armylife #soldier #indianarmylovers #bharat #vandematram #indianarmyvideo #nda #commando #ncc #armystrong #bharatmatakijai #indianarmyfans #motivation #indianarmyday

A post shared by Nashik On Web (@nashikonweb) on

दुरीकडे ध्रुवमधून एजेक्ट करणाऱ्या पायलटसने पराशुटच्या माध्यमातून थेट कार्यक्रमस्थळी हजेरी लावल्याने त्यांचेही उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. Topchi Army Artillery Deolali

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.