नाशिक सायकलीस्टतर्फे सायकल वापरणाऱ्या श्रमिकांचा सन्मान

नाशिक : घरकाम तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या व या कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या महिलांचा आज शनिवारी (दि. 14)  नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे श्रमिका सायकल रॅलीचे आयोजन करत यथोचित सन्मान करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या रॅलीत सुमारे 60 श्रमिक महिलांनी सहभाग नोंदविला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिक शहरात गेल्या 10 वर्षांपासून सायकल चळवळ चालविण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवत सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.Today Shramika Ride landmark event Nashik Cyclists Foundation

शनिवारी सकाळी 7 वाजता महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड ते शांतूषा लॉन्स, गंगापूर रोड अशा मार्गावर श्रमिका सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर या विशेष आमंत्रित श्रमिकांचा सन्मान करून त्यांना निलेश जाजू यांच्या सखी सारीज कडून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी  नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मार्गदर्शक हरीश बैजल, अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, वैभव शेटे, आदी सदस्य उपस्थित होते.

लीलाबाई राजपूत (वय ५८) गेल्या चाळीस वर्षापासून सायकल चालवत काम करण्याच्या ठिकाणी पोहचतात. यावेळी लीलाबाईंनी सांगितलेला अनुभव असा की, त्या काळात सायकल वापरण्यामुळे समाजात अनेकवेळा त्यांनी समाजातील प्रवृत्तींचा सामना केला. आजही मुले नोकरीला आहेत. आई सायकलवर कामाला जाते याची मुलांनाही लाज वाटते. मात्र मोटार सायकल वापरण्याची ऐपत असूनही गेल्या अनेक वर्षापासूनच्या सवयीमुळे सायकल चालवत काम करण्यास जाण्यासची वेगळीच मजा असल्याचे त्यांनी सांगितले. त्या घरोघरी जाऊन मसाज करण्याचे काम करतात.

तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध नाश्त्याचे पदार्थ सायकलवर विकणाऱ्या गौरी पटवर्धन यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या अनेक महिला कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या श्रमिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या घटकांना सायकल चळवळीत सामावून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. या श्रमिका सायकल रॅली साठी गौरी समाज कल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.

दरम्यान, नाशिकमध्ये सुरु असलेल्या या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून नाशिक शहराच्या विविध दहा विभागात दहा प्रमुख आणि कमिटीची नियुक्तीही यावेळी करत त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. शहरातील दहा प्रमुख विभागात एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली 5 किंवा अधिक कमिटी मेम्बर्सची टीम सायकलिंगच्या प्रचार व प्रसाराचे काम करेल.

पंढरपूर सायकल वारीची ऑनलाईन नोंदणी सुरु

त्याचप्रमाणे नाशिक सायकलिस्ट पंढरपूर सायकल वारीचा फेसबुक इव्हेंट द्वारे ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. 13 ते 15 जुलै दरम्यान निघणाऱ्या या पंढरपूर सायकल वारी मध्ये श्रमिका सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी यासाठी नोंदणी केली असून जास्तीतजास्त सायकल वारकर्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your   name or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.