Nashik Essentials Time Limit जीवनावश्यक सेवांसाठी वेळेचे बंधन हटवले; किराणासाठी गर्दी टळणार

नाशिक : राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नसेल असे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात अत्यावश्यक जीवनावश्यक सेवांसाठी सकाळी दहा ते दुपारी चार हे दिलेले बंधन मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे या सेवा पूर्णवेळ सुरळित सुरु राहणार आहे. Nashik Essentials Time Limit

शहर व जिल्ह्यात करोनाचा वाढता संसर्ग बघता अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळि दहा ते दुपारी चार या वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले होते. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी एकत्र बैठक घेत हा निर्णय घेतला होता.

त्यामुळे किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आणी इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने दिवसातून फक्त सहा तास खुली होती. मेडिकलला त्यातून सुट दिली होती. त्यामुळे गर्दी होणार नाही व करोना संसर्ग टाळता येईल, हा त्या मागचा प्रमुख उद्देश होता. मात्र, या सहा तासात वस्तु खरेदीसाठी जादा गर्दी होत होती व सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.

दरम्यान राज्य शासनाने लाॅकडाऊनमधून काही बाबींना सुट दिली आहे. त्यात अत्यावश्यक सेवेंना वेळेचे बंधन नसावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील सकाळी दहा ते दुपारी चार हे वेळचे बंधन मागे घेतले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी एकाचवेळी होणारी गर्दी टाळता येणार आहे. Nashik Essentials Time Limit

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.