TikTok Off बंद, नो टेन्शन… हे आहेत ‘टॉप १०’ देसी अॅप्स

टिकटॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप हवे असतील तर देसी अॅप्स आले आहेत. मेड इन इंडिया असलेल्या या अॅप्समध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. पाहा सध्या मार्केटमध्ये कोणकोणते देसी अॅप्स आहेत..TikTok Off

केंद्र सरकारने चायनीज संबंधित ५९ अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉक हटवण्यात आले आहे. भारतात आता टिकटॉक इतिहासजमा झाले आहे. टिकटॉक भारतात चालत नसल्याने आता जे टिकटॉकचा वापर करीत होते. त्यांच्यासाठी देसी अॅप्स आले आहेत. आज टिकटॉक सारखीच सुविधा देणारे देसी १० अॅप्स आहेत. टिकटॉकच्या बंदीनंतर देसी अॅप्स वेगाने व्हायरल होत आहेत. TikTok चायनीज अॅप्सच्या यादीत सहभागी होते. भारतात टिकटॉकचे कोट्यवधी युजर्स होते. जर टिकटॉकच्या बंदीनंतर तुम्हाला टिकटॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप हवे असतील तर देसी अॅप्स आले आहेत. मेड इन इंडिया असलेल्या या अॅप्समध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. पाहा सध्या मार्केटमध्ये कोणकोणते देसी अॅप्स आहेत…

Mitron App

प्ले स्टोरवर येताच मित्रों अॅप दिसतो. हे अॅप जवळपास टिकटॉकसारखेच आहे. अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपमध्ये ग्लोबल प्लॅटफॉर्मच्या टॉप व्हिडिओजसाठी फीड युजर्सला अॅप ओपन करताच दिसतात. तसेच शेअरिंगचा ऑप्शन सुद्धा आहे.

Chingari

ट्रेंडिंगमध्ये आलेले हे अॅप अँड्रॉयड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे. यावर युजर्संना स्थानिक भाषेचे ऑप्शन मिळतात. शॉर्ट व्हिडिओज शिवाय या अॅपमध्ये न्यूज वाचण्यासाठी एक खास फीचर देण्यात आले आहे.

Roposo

टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर वेगाने डाउनलोड होणाऱ्या या अॅप्समध्ये याचा समावेश होतो. अनेक भारतीय भाषेत व्हिडिओ बनवणे आणि शेयर करण्याचा ऑप्शन यात युजर्संना मिळतो आहे. या अॅपमध्ये खूप सारे फिल्टर्स देण्यात आले आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्संना कॉइन सुद्धा मिळतात.

HotShots

गाना अॅप प्लॅटफॉर्म हॉटशॉट युजर्संना शॉर्ट व्हिडिओज बनवण्यासाठी आणि डायलॉग्सवर लिपसिंक करण्याचा पर्याय या अॅपमध्ये देण्यात आला आहे. या अॅपचा ऑडियन्स बेस १५ कोटी युजर्सपर्यंत आहे. अॅपवर शॉर्ट व्हिडिओ शिवाय स्टोरीज शेयर केली जावू शकते.

MX TakaTak

प्रसिद्ध व्हिडिओ अॅप MX प्लेयर कडून हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप लाँच करण्यात आला आहे. यात खूप सारी कॅटेगरी ऑफर केली जात आहे. हे अॅप भारतात तयार करण्यात आले आहे. हे अॅप अँड्रॉयड युजर्संसाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

Trell

अॅपलवर वेगवेगळ्या भाषेत व्हिडिओ पाहा आणि शेअर केले जावू शकते.तसेच ट्रेलवर रेसिपी पासून प्रवास आणि ब्यूटी पर्यंत खूप सारी कॅटेगरीत क्रिएटर्स व्हिडिओ पोस्ट करीत आहेत. तसेच याचा युआय सुद्धा खूप साधा दिला आहे.

Moj App

मेड इन इंडिया मोज अॅपला लाखो युजर्संनी आतापर्यंत डाउनलोड केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. अॅपवर युजर्स आपले जवळपासच्या क्रएटर्सला फ्रेंड्स बनवू शकतात. तसेच हा ShareChat चा व्हिडिओ अॅप आहे.

Bolo Indya

इंडियन व्हिडिओ अॅपवर युजर्स शॉर्ट व्हिडिओज क्रिएट आणि शेयर करू शकतात. यावर अनेक भाषेचे व्हिडिओज शेयर केले जावू शकतात. ज्यात हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिया या भाषेचा समावेश आहे

Rizzle

हे अॅप पूर्णपणे भारतात केल्याचा दावा करण्यात येत आहे. या अॅपवर ६० सेकंदाचे व्हिडिओ बनवले जावू शकतात. हे अॅप अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही वर उपलब्ध आहे. यावर कोलॅब करण्याचा पर्याय सुद्धा मिळतो.

LitLot

केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी हे अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये शॉर्ट व्हिडिओज बनवले जावू शकते. या अॅपमध्ये ब्यूटी फिल्टर्स, बॅकग्राऊंड म्युझिक आणि इफेक्ट्स लावता येण्याचे ऑप्शन मिळतात.TikTok Off

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.