लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : येथील बाजार समितीच्या जवळून जात असलेला विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील बायपास लगत पाटील पेट्रोलियम पंपावर आज सकाळी दोन धामण जातीच्या सापांची मादी धामण मिळवण्यासाठी सुरु असलेली लढाईचा थरारक अनुभव लासलगावकरांना अनुभवता-पाहता आला. thrilling battle oriental indian rat snake female meeting lasalgaon nashik
सुमारे ८ ते ९ फुट लांबीच्या या धामण सापांची थरारक लढाई पहाण्यासाठी लासलगावकरांनी मोठी गर्दी केली होती.
धामण या सापांचे मार्च-एप्रिलमध्ये मिलन कालावधी असतो त्यामुळे मादीच्या शोधात नर भिरतात. अशी वेळी दोन नर समोरासमोर येत व त्या दोघांमध्ये लढाई होते. आणि जो नर या लढाई विजयी होतो त्या नर धामण सोबत मादीचे मिलन होते. thrilling battle oriental indian rat snake female meeting lasalgaon nashik
अशीची लढाई विंचूर-प्रकाशा बायपासला असलेल्या पाटील पेट्रोलियम पंपावर या धामण सापांची लढाई सुरु होती. सुमारे पाच ते सहा तास या सापांचा दुर्मिळ खेळ पहाण्याची संधी लासलगासह पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहन धारकांना या निमित्ताने मिळाली.
thrilling battle oriental indian rat snake female meeting lasalgaon nashik
Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com