COVID19 Nashik suspected patients 23 नवीन संशयित रुग्ण दाखल; होमकॉरंटाईन 259 व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : लासलगावनंतर नाशिक शहरात करोना रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून गोविंदनगर जवळील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्याअहवानानुसार नाशिक जिल्ह्यात एकूण २३ नवीन कोरोना सदृश्य रुग्ण दाखल झाले आहेत. COVID19 Nashik suspected patients

त्यामध्ये सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांचे निकटवर्तीय १९ जण आहे. तसेच २५९होमकॉरंटाईन असलेल्या व्यक्तीचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या वेगवेगळया पथकांचेमाध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

nashik coronavirus update city records second positive covid19 patient collector mandhare informed patient have delhi travel history Marathi

सोमवार ६ एप्रिल रोजी एकूण २७ कोरोना सदृश्य रुग्णांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुनेतपासणीसाठी पुणे येथील (एनआयव्ही) राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात पाठविण्यात आले होते.त्यापैकी १३ अहवाल प्राप्त झालेले आहेत. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित अहवालरात्री ९ वाजेपर्यंत प्राप्त होतील.

सध्या शहरासह जिल्ह्यात २ करोना पॉझिटिव रुग्ण जिलारुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही श्री. जगदाळे यांनी दिली.आज महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोविंदनगर परिसरातील कोरोना रुग्णाच्यासंपर्कात आलेल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली आहे. COVID19 Nashik suspected patients

आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संबंधित रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये२१० रुग्णांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात १००खाटा, डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयात ७० खाटा, सामान्य रुग्णालय मालेगाव येथे २० खाटा वउपजिल्हा रुग्णालय कळवण २० खाटा इत्यांदीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सर्व ठिकाणी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, पीपीई किट व मल्टिपॅरामॉनिटर्स व तज्ज्ञ डॉक्टरांची पथकेकार्यान्वित आहेत.बाह्य परिसरात कोरोनाचे विषाणु पडलेले असतील त्यामुळे आपण बाहेर पडल्यानंतर कोरोनाविषाणुचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांना घरा बाहेर पडू नयेप्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिन्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनीकेले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “COVID19 Nashik suspected patients 23 नवीन संशयित रुग्ण दाखल; होमकॉरंटाईन 259 व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.