Market Committee नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये हि आहे कोरोना नियमावली


  नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, हमाल  व  इतर नागरीक  यांच्या  दैनंदीन होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी नाशिक मनपाचे आयुक्त मा. राधाकृष्ण गमे यांनी त्यांचे दालनात  दि.23/06/2020 रोजी सकाळी 10.00 वाजता बैठक बोलाविली होती. सदर बैठकीत नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तसेच सचिव  यांचे उपस्थितीत एकाच ठिकाणी  होणाऱ्या  गर्दीचे  विक्रेंदीकरण करणेकामी  नाशिक  कृषी  उत्पन्न  बाजार समितीने खालीलप्रमाणे कार्यवाही करणेकामी सूचना/ आदेश देणेत  आलेले  आहेत.Market Committee

समितीने नाशिक शहरातील मैदाने, खुल्या जागा यांचा वापर दैनंदीन भाजी विक्री संदर्भातील लिलावासाठी करावा. तशी  यादी  मनपा, पोलीस विभागास कळविणेत यावी.समितीच्या बाहेरील बाजूस/ आवारात एकाच ठिकाणी  भाजी विक्रेते/ व्यापारी/ शेतकरी  गर्दी करणार नाही.

बैठक

याकरीता समितीने गणवेशधारी विशेष पथकाची  नियुक्ती  करावी. बाजार समितीमध्ये व्यापारी, शेतकरी, आडते, हमाल  यांना प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र Entry व Exit ची व्यवस्था करणेत यावी. जेणेकरुन एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.बाजार  समितीतील  हमालांना गणवेश, ओळखपत्राची सक्ती करणेत यावी. तसेच, सर्वांना  एकाच  दिवशी   प्रवेश  न  देता Rotation पध्दतीने  व्यवस्था  करणेत  यावी.

त्यामूळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.समितीच्या आवारात मालाची ने-आण करणेसाठी एका वेळेस एकाच शेतकरी, व्यापारी यांना प्रवेश देणेत यावा.  एकापेक्षा जास्त शेतकरी  किंवा व्यापारी प्रवेश करणार नाही व गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेणेत यावी.समितीच्या आवारात ओळखपत्राशिवाय प्रवेश देवू नये. प्रवेश करतांना त्यांचे ओळखपत्र तपासणी कामी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करणेत यावी व प्रत्येकाचे तापपान दररोज थर्मल/ इन्फ्रारेड थर्मामीटर ने तपासावे. समितीच्या आवारात 24 तास पूर्ण वेळ रुग्णवाहीकेची व्यवस्था करणेत यावी.

दैनंदिन भाजी खरेदी-विक्री करीता मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी बाहेरगावी माल ने-आण करण्याकरीता वाहनचालक जात असतात. बोहरगावाहून परतल्यानंतर त्यांची दैनंदीन  वैद्यकिय  तपासणी करण्याकरीता समितीमार्फत स्वतंत्रपणे  वैद्यकिय  पथकाची  व्यवस्था  करणेत  यावी. तसेच, त्यांना स्वखर्चाने क्वॉरोंनटाईन  करणेची  जबाबदारी  देखील  समितीची  असणार  आहे.विक्री   करतांना  व   सेवा   देतांना  अनावश्यक   गर्दी  होणार   नाही   व   दोन   व्यक्तींमध्ये  ( विक्रेता- ग्राहक  व ग्राहक – ग्राहक) यांच्यात  सुरक्षित  किमान  1  मीटर  सामाजिक अंतर असणे  बंधनकारक आहे.

प्रत्येक ठिकाणी  दैनंदीन स्वच्छता / निर्जुतुकीकरणची  व्यवस्था करणेत यावी. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याबाबत जबाबदारी  संबंधित नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपविणेत यावी.विक्री व सेवा देणारे शेतकरी तसेच संबंधित कर्मचारी यांनी  मास्क व हॅन्डग्लोजचा वापर करावा.समितीच्या आवारात सामाजिक अंतर राखणे, मास्क व हॅन्डग्लोजचा वापर करणे इत्यादीं बाबत  समितीने  दक्षता घ्याववयाची  आहे.अ

न्यथा  संबंधितांचे विरोधात पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करणेची जबाबदारी समितीची  राहील. याबाबत  केलेल्या  कारवाईचा  अहवाल  वेळोवेळी  मनपाकडे  सादर  करावा.       उक्त नमूद सूचनांचे/ आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था ही महाराष्ट्र साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम II  नुसार व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय व इतर कायदेशिर कारवाईस पात्र राहील.      सदरच्या बैठकीतमा.

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे,बाजार समिती मा.सभापती संपतराव सकाळे,मा.पोलीस उपायुक्त अमोल तांबे,मा.मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी,विभागीय अधिकारी विवेक धांडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत,बाजार समितीचे सचिव अरुण काळे,महेंद्र निकाळे आदी यावेळी उपस्थित होते. Market Committee

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.