इंपोर्टेड घडयाळे, मोबाईल चोरून मालकाला लाखोंचा चुना लावणारा सुपरवायजर अटकेत

इंपोर्टेड घडयाळे, मोबाईल चोरून मालकाला लाखोंचा चुना लावणार सुपरवायझर अटकेत

नाशिक : बॉईज टाऊन शाळा येथील दत्तात्रय सोसायटी मधील बंगल्यातून सुमारे ६ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा एैवज चोरीला घेला होता. या चोरीचा छडा पोलिसांनी लावला असून मालकाच्या सुपरवायझरनेच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार डॉ.हेगडेवार जॉगिंग ट्रॅक येथे सापळा रचून संशयीत इसम सिद्धार्थ हरिकिशोर सिंग (होलाराम कॉलनी ) याला पकडले आहे.त्याच्या कडे विचारपूस तपासणी केली असता त्याने कबुली दिली आहे. सिंग हा फिर्यादी प्रशांत साखला यांच्याकडे  सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याने साखला यांच्या घरातील चोरी करत सुमारे ६ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा माल चोरी केला.तो त्याने चोरी कबूल करत परत केला आहे. कोर्टात त्याला हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.