लॉकडाऊनमुळे बंद झालेली सिटी बससेवा उद्यापासून (२२ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. तशी एसटी महामंडळानेघोषणा केली आहे. शहर बससेवा महापालिकेने चालवण्याचे प्रस्तावित आहे.
त्यामुळे महामंडळ सेवा सुरू करणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आता महामंडळाने ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळणार आहे. city buses
मार्चमध्ये लॉकडाउन जारी केल्यापासून शहरातील रस्त्यांवर प्रथम बस धावणार आहे. लॉकडाउनमुळे बससेवा बंद असल्याने शहरातील निमाणी बसस्थानकासह अन्य शहरातील थांबे बंद स्थितीत होते. दरम्यान बससेवा पुन्हा सुरू होत असल्याने प्रमुख बसस्थानकांची स्वच्छता व निर्जुंतुकीकरणाचे काम महामंडळाने हाती घेतले.
जिल्हांतर्गत उपलब्ध बसगाड्यांप्रमाणेच सिटीबसमध्ये प्रवास करणार्या प्रवाश्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात प्रवाश्यांना मास्क बंधनकारक करण्यात आला असून अन्य नियम पाळावे लागणार आहे. तसेच महामंडळातर्फे सिटी बसगाड्यांचे सातत्याने निर्जुंतुकीकरण केले जाणार आहे.
खालील मार्गावर धावणार बस