Nashik Maharashtra Unlock Rules जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली नवीन नियमावली, काय आहेत बदल?

28 मे रोजी केंद्र सरकारने लोकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. मुख्यत्वे करून यात टप्प्याटप्प्याने जनजीवन सुरळीत करण्यासाठी सूट दिल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यास अनलॉक इंडिया म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ही समाजजीवन रुळावर आणण्यासाठी मिशन बिगीन अगेन अर्थात पुनःश्च हरिओम असा शब्दप्रयोग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. Nashik Maharashtra Unlock Rules

याच पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज रोजी आदेश पारित केला आहे. सुरुवातीपासूनच योग्य नियोजन आणि उपाययोजना केल्याने नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहरात अनेक सवलती आधीपासूनच दिल्या गेल्या असल्याने आधीपेक्षा नवीन आदेशात विशेष बदल जाणवत नाहीत. मात्र महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या दिनांक प्रमाणे वेळोववली काही सूट मिळणार आहेत. पुढे वाचा काय आहेत सवलती आणि नियम…

???????????????

कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली.

जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोकिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

याकरिता उपरोक्त वाचले क्र.9 वर नमुद आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन हा दिनांक 30/06/2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो वाढविण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुरज मांढरे यांनी अधिकाराचा वापरकरुन नाशिक जिल्हयात कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून संपूर्ण नाशिकजिल्हयात दिनांक 01/06/2020 रोजीचे 00.01 वाजेपासून ते दिनांक 30/06/2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रियासंहिता, 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये खालील प्रमाणे आदेश लागू करीत आहे.

1. नाशिक जिल्हयात उक्त नमूद कालावधीत कोणतीही व्यक्ती / नागरिक यांना रात्री 09.00 ते सकाळी 05.00 वाजेपावेतो अत्यावश्यक बाब वगळता अनावश्यकरित्या फिरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल.new rules

2. नाशिक जिल्हयात उक्त नमूद कालावधीत सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालययांनी सामाजिक अंतरासंदर्भात (Social Distancing) निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल.

3. कन्टेनमेंट झोनमध्ये भाजीपाला, फळे, किराणा आणि इतर जिवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडणे आणि विक्री करणे यासाठी सकाळी 10.00 ते दूपारी 04.00 या वेळेचे बंधन राहिल. तसेच किरकोळ दुध विक्रीकरिता सकाळी 06.00 ते सकाळी 07.30 व दुपारी04.00 ते सायं.05.30 या वेळेचे बंधन राहिल.कन्टेनमेंट झोनमध्ये इतर वेळेत उक्त आस्थापना बंद राहतील. तथापि, आपात्कालीन वैद्यकिय सेवा आणि अत्यावश्यक वस्तु व सेवा यांचा पुरवठा सुरळीत ठेवणेकरिता उक्त प्रतिबंध लागु असणार नाहीत.

4. मा.मुख्य सचिव, म.रा.मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक No: DMu2020/CR-92/Dism-1, दिनांक 31 मे, 2020 मध्ये नमुद असलेल्या तरतुदी/बाबी या टप्याटण्याने निश्चित करण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार सर्व संबंधितांना बंधनकारक राहतील.

5. 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील बालक, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच रहावे. तथापि, अत्यावश्यक गरजा/सेवा, वैद्यकिय सेवा घेण्याकरिता संबंधितांना मुभा असेल.

6. नाशिक जिल्हयात कोणतीही व्यक्ती / नागरिक यांना सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहिल. तसेच उघडयावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी राहिल. तथापि, सदरील बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

7. नाशिक जिल्हयात घेण्यात येणारे मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शेक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार तसेच इतर मोठया प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमभरविण्यास बंदी घालण्यात येत आहे.

आदेश

(अपवाद – विवाहाकरिता जास्तीत जास्त 50 व्यक्ती, अंत्यविधी करिता जास्तीत जास्त 20व्यक्ती यांना विहीत केलेल्या सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करण्याच्या अधीन राहुन एकत्र येण्यास मुभा देण्यातयेत आहे. Nashik Maharashtra Unlock Rules

आदेश

8. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखु इत्यादींचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदरच्या आदेशापुर्वी सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणी करणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम144 (2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी पारित करण्यात येत आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समुह हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेचभारतीय दंड विधानचे कलम 188 तसेच इतर प्रचलीत कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. Nashik Maharashtra Unlock Rules

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.