त्रास देणाऱ्या भावाचा लहान भावानेच दगडाने ठेचून केला खून


नाशिकमध्ये दारू पिल्यानंतर घरात सतत त्रास देणाऱ्या भावाचा लहान भावाने दगडाने ठेचून खून केला आहे. पोलिसांना मृतदेह पेठ रोडवरील नामको कँन्सर हॉस्पिटलच्यासमोर रस्त्यालगत आढळून आला आहे. संतोष सखाराम थोरे (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित सुनिल सखाराम थोरे (३५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


या घटनेमध्ये संतोष व सुनिल हे दोघे सख्खे भाऊ विद्यानगर येथे राहतात. संतोष बाजारसमितीत हमाली काम करत होता. तर सुनिल पेठरोड बाजारसमिती येथे मापारी काम करतो. मंगळवारी सकाळी मयत संतोष हा सुनिल काम करत असलेल्या बाजारसमितीतील गाळ्यावर गेला असताना मालकाने सुनिलला फोन करून तुझा भाऊ दारू पिऊन येथे शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर सुनिल संतोषला गाडीवर बसवून घरी सोडण्यासाठी जात असतांना संतोषने दारू प्यायची असल्याचे सांगत गाडी थांबवायला सांगितली. मात्र सुनिलने गाडी थांबविली नाही, त्यावरून दोघात बाचाबाची झाली असता संतोषने चालत्या गाडीवरून नामको हॉस्पिटलजवळ उडी मारली. त्यानंतर संतापाच्या भरात सुनिल याने मोठा दगड हातात उचलून संतोषच्या डोक्यात टाकला. संतोषचा जागीच मृत्यू झाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.