कुवेत येथे होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना

Share this with your friends and family

नाशिक : वरिष्ठ गट आशियायी आंतरराष्ट्रीय मिश्र तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष संघ काल मुंबई येथून रवाना झाला. या संघात नाशिक मधील अजिंक्य दुधारे, विशाल कोंडी (सेनादल), सतीश गर्णाईक (पंजाब) , विशाल थापर (जम्मू आणि काश्मीर) हा संघ नाशिक येथून रवाना झाले तर टी. पी. विनोद हा एसएससीबीचा खेळाडू यांचा या संघात समावेश आहे.
कुवेतमध्ये १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. १० फेब्रुवारीला नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर या संघाने ३ दिवस सराव केला. यावेळी नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. या वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू अनुभवी खेळाडू असून त्यांना अश्या प्रकारच्या स्पर्धांचाही अनुभव आहे. कुवेत येथे होणाऱ्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून पदकांची कमाई करतील असा विश्वास तलवारबाजी  प्रशिक्षक राजू शिंदे यांनी  व्यक्त केला आहे.

कुवेत येथे दिनांक १६ ते २१ फेब्रुवारी दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय तलवारबाजी खेळाडू अजिंक्य दुधारे,सतीश गरनाईक, विशाल थापर यांना शुभेच्या देतांना राजू शिंदे, नितीन हिंगमिरे, शशांक वझे आदी.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.