prisoner मास्कच्या दोरीने त्याने घेतला गळफास

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईच्या एका कैद्याने मास्कच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना बुधवारी (दि.७) सकाळी ७ वाजेदरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक संपत आडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.prisoner

Home quarantine, self-isolation because of the Coronavirus disease, COVID-19. Man in a medical mask near the window. Boredom and depression during quarantine. Waiting for quarantine to be canceled.

कैद्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी (३२) असे आत्महत्या करणाऱ्या मृत कैद्याचे नाव आहे. काही वर्षा पासून अजगर मन्सुरी कारागृहात शिक्षा भोगत होता. बुधवारी (ता.७) सकाळच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात अजगर अली मन्सुरी याने मास्कच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब कारागृहातील पोलीस व वैद्यकीय अधिकार्‍याच्या निदर्शनास आली.  कैद्यांच्या बराकीत मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कारागृह रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. prisoner

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.