चादरीच्या साहाय्याने कैद्याने केली आत्महत्या

नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या नाशिकरोड जेलमध्ये देत असेलेली चादर घेत एका कैद्याने स्वतः फास घेवून आत्महत्या केली आहे. यामध्ये आरोपी हा  खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याला  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातजन्मठेपेची शिक्षा झालेली होती. आरोपी हा उत्तरप्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) होता. त्याने पहाटे आत्महत्या केली आहे.

सविस्तर वृत्त असे की राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात २००४ मध्ये महंत मोहनगिरी जोशीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये पोलिसानी गुन्ह्यात अटक केल्यावर आणि न्यायालयात निवडा झाला त्यावेळी  महंत जोशी यास १२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली, यामध्ये आरोपी हे मागील बारा वर्षांपासून मोहनगिरी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते़. तर त्यांचा बंदी क्रमांक पी़७१ आहे. मात्र जोशी याने मध्यरात्री नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागातील शौचालयात त्याला दिलेली चादर फाडून त्याची दोरी करत गळफास घेत  आत्महत्त्या केली़ आहे. हा सर्व प्रकार गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याला डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ आहे. अजूनही पोलीस आणि कारागृहला त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.