वाचनालये ही ज्ञानयुगातील देवालये – प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर

वाचनालये ही ज्ञानयुगातील देवालये – प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर

नाशिक : माणसाला माणसापर्यंत घेवून जाण्याचे काम वाचन करत असते. वाचनाने केवळ साहित्याचा नव्हे तर माणसाचा शोध घेतला गेला पाहिजे. वाचनालये ही सध्याच्या ज्ञानयुगातील खरी देवालये असून त्यातील पुस्तकरूपी देवांची आराधना करायला हवी असे प्रतिपादन प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर पुढे म्हणाले, वाचनाने मनुष्य ज्ञानी. बहुश्रुत, अनुभवी होत असतो. तसेच माणसातील अंतर्मनातील ज्योत पेटत असते. सध्याच्या सोशल मिडियातील माध्यमांतून होणारे वाचन हे अपूर्ण व तकलादू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. राजेंद्र वडनेरे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानात आजकाल मोठी क्रांती झाल्याने मोठी ग्रंथसंपदा असलेल्या ग्रंथांचे भवितव्य काय ? यावर चर्चा केली.

वाचन संस्‍कृती रुजविण्याची गरज – डॉ. हेमंत राजगुरू

नाशिक :    ग्रंथ किंवा पुस्‍तके माणूस घडविण्‍याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्‍कृत, प्रगल्‍भ होतात. देश भौतिकदृष्‍टया कितीही विकसित असला तरी तो सांस्‍कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्‍यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाचन संस्‍कृती आता घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी नियोजन अधिकारी डॉ. हेमंत राजगुरू यांनी केले.

डॉ. हेमंत राजगुरू म्हणाले, नव्‍या पिढीची मानसिकता ओळखून त्‍यांच्‍या सोयीने पुस्‍तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्‍यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केल्यास वाचन संस्‍कृतीचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल. वाचन चळवळीला खरी गतीमानता प्राप्‍त होईल. मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहात आज काही शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत धड्याचे लेखक संतोष साबळे यांनीही विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. समाजाच्या विकासासाठी ग्रंथ हेच गुरु असून वाचनातून जीवन समृद्ध करायला हवे असे ते म्हणाले. दैनंदिन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी खेळ, कला, संस्कृती, परंपराही जोपासायला हवी असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव तरवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राजक्ता देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.