railway station या आहेत नाशिक रोड रेल्वे स्थानकातील पहिल्या महिला कुली

देशातील रेल्वेस्थानकांवर नेहमी दिसून येणारे लाल कपड्यातील कुलींमध्ये पुरुषवर्गाचेच वर्चस्व आहे. मात्र आता त्याला अपवाद नाशिक देणार आहे. आता या क्षेत्रात महिला दिसणार आहे.

भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभागात पहिल्यांदाच एक महिला नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सेवेत रुजू होते आहे. त्याचे नांव श्रीमती इंदूबाई वाघ असे असून, वारसातून त्यांना 07 क्रमांकाचा बिल्ला मिळाला आहे. पतीच्या निधनानंतर त्यांना हक्काचा रोजगार मिळणार आहे. railway station female porter

वाघ यांच्या पतीचे निधन झालेले आहे. तर, त्यांचे वडील पांडुरंग मानकर हे नाशिक स्थानकावर कुली म्हणून कार्यरत होते. ओझे वाहून मिळालेल्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.

मात्र, अतिश्रम आणि वृद्धपणामुळे त्यांच्याकडूनही काम होत नव्हते. रेल्वे प्रशासनाने केलेल्या वैद्यकीय तपासणीत ते अयोग्य ठरले होते.

रेल्वेच्या नियमानुसार, वडिलांच्या जागी त्यांची विधवा मुलगी श्रीमती इंदूबाई एकनाथ वाघ यांना कुलीचा बिल्ला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, मध्य रेल्वेचे भुसावळ आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक युवराज पाटील यांनी इंदूबाई वाघ यांची नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रथम महिला कुली म्हणून नियुक्ती केली.

वाणिज्य विभागाचे अधीक्षक योगेश नागरे यांनी नियुक्तिपत्र देत श्रीमती वाघ यांचे स्वागत केले. railway station female porter

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.