मेरी परिसरात नागरी वसाहतीत बिबट्याच्या संचार, पिंजरा लावला

नागरी वसाहतीत बिबट्याच्या संचार, पिंजरा लावला

नाशिक : नाशिक शहरातील मेरी परिसरात रविवारी सकाळी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलेला आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर चक्क बिबट्याने ठिय्या मांडलेला दिसला. या बिबट्याची काही फोटो धाडसी नागरिकांनी मोबाइलच्या कॅमेऱ्याने काढून  काही वेळेतच हे फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर ते मोठ्या संख्येने  व्हायरल झाले. अखेर वनविभागाने सदरची कारवाई केली आहे. 

सदरच्या परिसरातील नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही मेरी हायड्रो कडील भागात अंधारात एकटे बाहेर पडू नये वन विभागाकडून पिंजरा लावलेला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  वनरक्षक, वनपालांच्या ‘रेस्क्यू’ पथकाने मेरी परिसरातील हायड्रो भागात धाव घेतली व मेरी परिसरात जिथे बिबट्या दिसला. त्या  भागात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलेला आहे.  पिंजरा ज्या भागात लावलेला आहे त्या भागात कोणीही जाऊ नये असे आव्हान वन विभागाकडून करण्यात आलेले आहे.

फोटो :  पिंजरा मेरी हायड्रो ह्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतांना जगदीश पाटील,   नगरसेवक कमलेश बोडके, सभापति माने ताई व पपु माने , मनोज वाघ व इतर नागरिक

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.