नाशिक शहरालगत असलेल्या गिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या मालवाहु ट्रकने समोरुन येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंगाम्हाळुंगी येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यु झाला. तर पाच प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे. सदरचा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास झाला.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या अपघातात गिरणारे-धोंडेगाव रस्त्याने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पालवे कुटुंबिय त्यांच्या टेम्पोत (एम.एच१५ एफ.यु ९३६३) बसून गिरणारेकडून गंगाम्हाळुंगीच्या दिशेने प्रवास करत येत होते. यावेळी हरसुलच्या दिशेने गिरणारेकडे माती वाहून नेणारा अवजड ट्रक (एम.एच.०४ डीडी९०७०) भरधाव वेगाने निघाला होता, हा ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. यावेळी टेम्पोतील महिला, पुरुष बाजूला फेकले गेले. यावेळी आजुबाजुच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना तत्काळ जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. accident
यावेळी उपचार सुरु असताना रात्रीच्या सुमारास निर्मला जनार्दन पालवे (३०) तर गुरुवारी सकाळी रेखा उर्फ पुनम वाल्मिक पालवे (३५,दोघी, रा.गंगाम्हाळुंगी) यांचा मृत्यु झाला. तसेच टेम्पोचालक बाळु अर्जुन पालवे (३८), यशवंत काशिनाथ पालवे (४०), यमुना श्रावण पालवे (३०), भागाबाई भगवान पालवे (३०), तुळसाबाई तुळशीराम पालवे (४०), शिलाबाई देवानंद पालवे (४०,सर्व रा. गंगाम्हाळुंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला असून त्याच्यावरिुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.accident