Teacher Student Harassment मास्तरचा प्रताप पाच मुलींवर लैगिक अत्याचार

शिक्षकी पेश्याला आणि गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यात प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने वर्गातील पाच मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. ही घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील कुरु ंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Teacher Student Harassment

हे प्गरकरण जेव्हा समोर आले तेव्हा प्रशासन जागे झाले आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत अहवाल पाठवला गेला होता. त्याचनुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी पोलिसांत या नराधम शिक्षकाच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी जिल्हा परिषद शाळेत रोहिदास मदन चव्हाण (रा. साईसृष्टी अपार्टमेंट, जाधव संकुल जवळ, पळसे, ता. जि. नाशिक) हा प्राथमिक शिक्षक काम करत आहे.

याच शाळेतील वय वर्षे १३ ते १४ वयाच्या लहान अश्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल महिन्यापूर्वी रोहिदास चव्हाण वर्गात जेव्हा येत असे तेव्हा वर्गाच्या खिडक्यांचे पडदे, दरवाजा पूर्ण लावत असे. तर तो त्यानंतर या मुलींच्या बाकांवर बसून त्यांच्या सोबत लैगिंक चाळे करीत होता. या लहान मुलींनी याची वाच्यता कुठे करू नये म्हणून त्या करिता त्याने या सर्वाना धमकावले देखील होते.

याबद्बल गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रकरणाची पूर्ण माहिती जिल्हा परिषदेकडे पाठविली. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिका-यांनी इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला. त्यानुसार घोटी पोलिसांनी लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, शीतल गायकवाड याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

#देवळाली येथील खंडोबाची टेकडी परिसरात जुन्या पेटेन टँकवर हा #बिबट्या असा निर्धास्त, निवांत झोपला 😴 होता. आज (दि. 6)…

Nashik On Web ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ನವೆಂಬರ್ 5, 2019

Teacher Student Harassment

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.