तळेगाव प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा – छत्रपती संभाजीराजे

नाशिक : तळेगाव येथे घडलेली घटना दुर्देवी असून अत्याचारग्रस्त मुलीची तब्येत आता व्यवस्थित आहे. याप्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. अत्याचरग्रस्त मुलीची व कुटूंबियांची भेट घेण्यासाठी ते बुधवारी  शासकीय रुग्णालयात आले होते. त्यानंतर विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांनी शांतता राखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, सामाजिक समतोल बिघडला जावू नये यासाठी प्रयत्न करावा असे संभाजीराजे यांनी  सांगीतले. दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अशांतता आहे. टोळक्‍यांचा उच्छाद वाढूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या आरोपावर त्यांनी पोलिसांची भुमिका चुकीची असल्याचे वक्तव्य करून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती व्हावी, मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अभ्यास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.