पिडीतेच्या पतीसोबत राजकीय वैर; बदला घेण्यासाठी दोघा भावांचा विवाहितेवर बलात्कार

या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे

नाशिक : पिडीतेच्या पतीसोबत राजकीय वैर होते. त्याचा बदला त्या दोघांना घ्यायचा होता, यासाठी नियोजन करत दोघा सख्या भावांनी एका विवाहित पिडीतेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. उपनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे. taking political revenge brothers rape another mans wife case filed

सविस्तर वृत्त असे की, संशयीत आरोपी किरण रमेश जाधव (वय 23) त्याचा सख्खा भाऊ  रतन रमेश जाधव (वय 26, रा. मु. मुळेगाव, पो. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा नराधम भावांची नावे आहेत.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिरायादिनुसार संशयित किरण जाधव याने नोव्हेंबर 2015 पासून ऑक्टोबर 2017 या कालवधीत पिडीते च्या पतीसोबत असलेली गावातील राजकीय खुन्नस काढण्यासाठी, तसेच सोबत बदला घेण्याच्या इराद्याने पीडित विवाहितेच्या पतीची प्रतिष्ठा मलिन करण्याच्या हेतूने तिचा वेळोवेळी पाठलाग केला आहे.

पीडितेच्या पतीचे व संशयित किरण जाधव याचे भांडण झाले होते. त्यांचा समझोता करण्यासाठी संशयिताने जबाब देण्यासाठी पीडितेला पोलीस ठाण्यात घेऊन जातो, असा बहाणा करून आपल्या मोटारसायकलवरून पीडितेला दूर नेऊन, आधीच निश्चित केलेल्या  भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये ठेवून बदनामी करण्याची धमकी देत, दमदाटी करून तिच्यावर बलात्कार केला आहे. तर या नंतर तिला संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले आहे. taking political revenge brothers rape another mans wife case filed

किरण जाधव याचा भाऊ रतन जाधव याने त्याच्यासोबत संगनमताने कट रचून पीडितेला माहेरहून पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी घेऊन जाण्याचा कारण देत तिला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर रोड या ठिकाणी फसवून नेत बलात्कार केला आहे.

त्यानुसार दोघा भावांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

taking political revenge brothers rape another mans wife case filed

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters). Nashik On Web

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.