कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका १७७ पेक्षा जास्त देशांना बसला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. आत्तापर्यंत जगभरात काही लाखांहून अधिक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण याची लक्षणे दिसल्यास घाबरण्याची गरज नाही. पण आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.corona virus
कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्याला जर रोखायचा असेल तर आपन सध्या काही काळ तरी घरातच थांबले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाने टाळले पाहिजे, सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे. खाली दिल्या प्रमाणे जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनाला रोखू शकतो.
फ्ल्यूसारखी लक्षणे दिसल्यास…
फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास करायचे काय हा मोठा प्रश्न सध्या अनेकांना पडत असेल पण त्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांना फोन करून याची माहिती देऊ शकता आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.corona virus
गरज असेल तर रुग्णालयात जा
फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. थेट रुग्णालयात जाऊ नका तर काही शंका असेल तर थेट डॉक्टरांना भेटण्यासाठी जाऊ नका. आधी त्यांच्याशी फोनवर बोला आणि सविस्तर माहिती घ्या. गरज असेल तरच रुग्णालयात जावे.corona virus
फोन करून अधिक माहिती घ्या
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांकडून काही हेल्पलाईनही सुरु केली आहे. त्यावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
सूचनांचे पालन करा
सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर सरकारने जारी केलेल्या फोन नंबरवर फोन करून तुम्हाला काय होत आहे याची माहिती द्या. त्यानंतर ते देतील त्या सूचनांचं पालन कराcorona virus
रेमडीसीविर औषध आता जिल्हा सामान्य रुग्णालयासह पाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणा: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक, दि 25
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडीसीविर या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे औषध आता जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील पाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशाद्वारे कळविले आहे.
शासकीय आदेशात नमूद केल्यानुसार, कोरोना रुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर रेमडीसीविर हे औषध वापरले जाते. या औषधांचा पुरवठा सर्वसामान्यांना वेळेत व्हावा या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फार्मसी कक्षात 50% साठा तर उर्वरित साठ्यापैकी मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बिटको रुग्णालयात तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वसामान्यांना सोयीचे असेल अश्या दोन खाजगी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. याबाबत घटना व्यवस्थापक यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येतील