महिलेचा स्वाईन फ्लू सारख्या आजाराने मृत्यू

महिलेचा स्वाईन फ्लू सारख्या आजाराने मृत्यू
नाशिक : स्वाईन फ्लूचा अजूनही धोका कमी झाला नसून, परिणाम दिसून येत आहे. तर त्यात वातावरणही मोठा परिणाम करत आहे. नवीन नाशिक अर्थात सिडको येथील पवननगर भागात राहत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.या आजारात समशुन्नीसा जमादूर अन्सारी (३५) मृत्यू झाला आहे. अन्सारी यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांना उपचार करण्यासाठी  खासगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लू सदृश्य आजाराचे लक्षणे दिसू लागल्याने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयातील स्वाईन फ्लू नियंत्रण कक्षामध्ये हलविण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे. त्यामुळे या रोगापासून काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरले आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.