लासलगाव येथून पोलिस संरक्षणात दुध गुजरातला रवाना

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत दूध पोहचू न देण्याची भूमिका स्वाभिमानी संघटनेने घेतली आहे. मुंबईसह राज्यभरात दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सरकारनेही कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून सरकारकडून दूधवाहक टँकर्सना पोलीस संरक्षण देताना दिसत आहे. Swabhimani Shetkari Sanghatna Police Security Milk Basic Price Subsidy Agitation

नाशिक जिल्ह्यात हे आंदोलन फारसे तीव्र दिसत नसले तरीही लासलगांव येथील दोन खाजगी दूध संकलन केंद्रातुन सुमारे वीस हजार लिटर दुधाचे टँकर पोलीस संरक्षणात सूरत कडे रवाना करण्यात आल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली.

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविवार मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. Swabhimani Shetkari Sanghatna Police Security Milk Basic Price Subsidy Agitation

दुधासह शेतमालाला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने संप सुरू केला आहे. त्यातच शहरी नागरिकांची रसद थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील नागरिकांना दुधाची कमतरता होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त दिला असल्याचे चित्र दिसत आहे.

त्याचाच फायदा लासलगाव येथील खाजगी दूध संकलन केंद्राच्या संचालकांनी घेत पोलिस बंदोबसतात वीस हजार लिटर दूध भरलेले टँकर सुरत येथील सुमुल दूध डेअरीसाठी पाठवले आहे.

हे दूध सुमुल डेअरी येथे पोहोचल्यानंतर पॅकिंग करून मुंबईसाठी रवाना केले जाणार असल्याची माहिती दूध संकलन केंद्राचे संचालकांनी दिली.

Swabhimani Shetkari Sanghatna Police Security Milk Basic Price Subsidy Agitation

(छायाचित्र समीर पठाण लासलगाव)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.