pregnant married woman पाथर्डी फाटा गरोदर विवाहितेचा खून हा आहे संशयित आरोपी

नाशिक येथील पाथर्डीफाटा परिसरातील असलेल्या म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या ‘सी’ विंगमधील दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत शनिवारी दुपारी एका गरोदर विवाहितेचा खून झाला होता. या गंभीर पक्ररणी त्याच  रात्री उशिरा विवाहितेच्या वडिलांनी त्यांच्या जावयाविरुध्द खूनाचा संशय असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात केली आणि लगेच पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी विवाहितेचा पती भरत ढवळा जाधव (२८, फ्लॅट-१००२, म्हाडा इमारत) याला अटक केली. pregnant married woman

तर या प्रकरणी सर्वातील भरत याने घरात चोर घुसले आणि त्यांनी हा खून केला असा बनाव केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात स्पष्ट झाले आहे. नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

भरत हा सातपुर येथील एका दुकानात काम करतो. तर हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कोकणवाडी येथील रहिवासी आहे. मयत विवाहिता प्रमीला (२६) हिचा विवाह दोन वर्षांपुर्वी भरसोबत झाला. आणि त्या नंतर हे दोघे पांडवलेणी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. मागील वर्षभरापुर्वीच प्रमीला यांचे वडील फिर्यादी तानाजी सावळीराम कचरे (५४, रा. कचरवाडी, ता.इगतपुरी) यांचा भाचा सचिन झोळे याच्या मालकीची म्हाडा इमारती मध्ये ते राहत होते.

या प्रकरणात, शनिवारी प्रमीलाचा पती संशयित भरत याने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षास फोन करत त्यांच्या राहत्या घरात चोरटे आले व त्यांनी दागिणे घेऊन माझ्या पत्नीला ठार मारुन पळून गेले असे कळवले होते. तर मयत प्रमिलाच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांकडून नमुद करण्यात आलेली मृत्यूची वेळ आणि घटना यामध्ये मोठी तफावत आढळून अली होती,ती स्पष्ट झली.

सोबतच त्या घरात कुठल्याही प्रकारची मोठी रोकड नव्हती आणि प्रमीलाच्या अंगावर केवळ मंगळसुत्र आणि कानातले टॉप्सव्यतिरिक्त अन्य कोणतेही दागिणे नव्हते. तसेच घरातील कुठलेही सामान अस्ताव्यस्त झालेले नाही, आणि काही चोरीलासुध्दा गेलेले नाही, असे प्रमीलाचे वडील तानाजी यांनी फिर्यादीत नमूद केले

तर माझा जावई भरत यानेच प्रमीलाचे तोंड उशीने दाबून व गळा टॉवेलने आवळून ठार मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संशयित भरत याने सांगितलेली हकीकत घटनास्थळावरील कुठल्याही बाबीशी सुसंगत तर नाहीच जुळून सुद्धा येत नाही हे त्यांनी फिर्यादीत नमूद  केले आहे.

अजूनही गुन्हा कबूल केला नाही
प्रमीलाचा काहीतरी कारणावरून तिचा पती भरत जाधव यानेच खून केल्याचा संशय फिर्यादीत सासरे कचरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नाही,

बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती पोलीस यंत्रणेला दिली नाही. भरत यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली. या खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर हे करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.