युथ पॉलिसीसाठी सुचना करायला हव्यात – सुप्रिया  सुळे

आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी काय काम करावे याची सुचना विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींना करायला हवी. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्राची युथ पॉलिसी तयार केली होती. आता पुन्हा नव्याने एक नवी युथ पॉलिसी तयार करण्याची वेळ आली आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यामध्ये सुळे यांनी बोलताना म्हणाल्या की  तरुणांनीच या युथ पॉलिसीसाठी सुचना करायला हव्यात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई त्यावर काम करेल. आजही काही भागांत स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. त्यामुळे शाळेपासूनच याबाबत मुलांचं प्रबोधन करायला हवं असं मत काही विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रकट केलं. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना सेक्स एज्युकेशन द्यायला हवे अशी सुचनाही काही विद्यार्थ्यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नक्कीच या गोष्टींचा पाठपुरावा करेल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने आयोजित केलेल्या जागर युवा संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस. या जागर युवा संवाद यात्रेनिमित्त नाशिकच्या के.बी.टी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास होळकर, संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, अमृता पवार, रविंद्र पगार इतर मान्यवर उपस्थित होते.

नाशिक शहरात योग्य सुविधा नाहीत, पाण्याची समस्या आहे, योग्य रास्ता नाही, वाहतूक व्यवस्था योग्य नाही, रेल्वे सेवा योग्य नाही, पार्किंग झोन नाहीत अशी खंत विद्यार्थ्यांनी उपस्थित केली. राज्यातील लोडशेडिंग, शिक्षण व्यवस्था असे असंख्य मुद्दे विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. या महाविद्यालयातील विद्यार्थी ऐवढे व्यापक विचार करतात हे फार कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या आणि सुचना विचार करण्यासारख्या आहेत. मी नक्कीच हे मुद्दे संसदेत उपस्थित करेल असे आश्वासन विद्यार्थ्यांना देते.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.