लासलगाव : मुलीचे देवासोबत लग्न लावा अन्यथा प्रकोप होईल असे सांगणाऱ्या भोंदूला अटक

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

अंगात दैवी शक्ती येत असल्याचे भासवत मुलीचे देवासोबत लग्न लावून द्यावे. लग्न लावून दिले नाही तर देवाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून मुलीशी चुकीच्या पद्धतीने विवाह करणाऱ्या एका भोंदू बाबावर लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Superstition Case Lasalgaon Bhondu arrested Nashik Rural Police

शिवाबाबा उर्फ शिवनाथ संजय क्षीरसागर, रा. भरवस शिवार ता. निफाड असे या भोंदूचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात लासलगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार शिवाबाबा हा फिर्यादीचे घरी व भरवस येथील नागेश्वर मंदिर येथे स्वप्नात शिवलिंग दृष्टांत येत असल्याचा दावा असणाऱ्या ठिकाणी 2 वर्षांपासून जात होता. यावेळी तुमची मुलगी देवाला अर्पण करावी लागेल, तिचे देवाशी लग्न लावून द्या अन्यथा तुमच्या कुटुंबावर दैवी कोप होईल अशी भीती दाखवीत होता. Superstition Case Lasalgaon Bhondu arrested Nashik Rural Police

या दरम्यान त्याने पीडित मुलीचा स्वतःशी रजिस्टर पद्धतीने विवाह लावून घेतला म्हणून पीडित मुलीच्या आईने लासलगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

लासलगाव पोलिसांनी शिवाबाबा या संशयित भोंदूवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध होणेबाबत 2013 चा कायदा अन्वये 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Superstition Case Lasalgaon Bhondu arrested Nashik Rural Police
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.