जन्मदात्या वृद्ध आई ,सासूचा नरबळी देणाऱ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

नाशिक कोर्टाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष नरबळी प्रकरणी  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात  आई व  सासूचा नरबळी दिला होता. यामध्ये कोर्टाने  11 आरोपींना  शिक्षा सुनावली आहे. हे सर्व प्रकरण  ऑक्टोबर 2014 मध्ये घडले होते. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़.या मध्ये मुख्य आरोपी असलेल्या  बच्चीबाई खडसे तांत्रिक महिलेसह आई आणि सासूचा नरबळी दिला होता.  श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणले होते.

यामध्ये घरातील वृद्ध महिलांमुळेच तुम्हाला कोणतेच  सुख मिळत नाही त्यामुळे समाधान नाही , पैसा टिकत नाही, असा समज मांत्रिकाच्या नादी लागलेल्या काशीनाथ आणि गोविंद दोरे या भावांचा केला होता. या प्रकारात त्यांनी त्यांची जन्मदात्या आईसह सासू आणि तांत्रिक महिलेचा बळी दिला.

यामध्ये बळी देण्या आधी त्यांनी आईच्या विवस्त्र शरीरावर नाचले आणि त्या महिलेचे  हाल केले व तिचे डोळेही फोडले. मांत्रिक महिलेच्या सासूलाही अशाचप्रकारे हाल करुन जीवे मारण्यात आले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या बहिणीने विवस्त्र अवस्थेतच पळ काढला आणि आपला जीव वाचवला होता. हे सर्व प्रकरण श्रमजीवी संघटनेने उघड केले होते. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी तपास करत सर्व पुरावे गोळा केले होते आणि या सर्व आरोपींना पकडले होते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी न्यायालयासमोर आलेल्या पुुराव्यानुसार आरोपी बच्चीबाई खडके, बुग्गी वीर, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे, गोविंद मोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, हरी निरगुडे, सनीबाई निरगुडे (रा़ टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) या अकरा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अ‍ॅड़ पौर्णिमा नाईक व दीपशिखा भिडे यांनी या खटल्यात काम पाहिले आहे .

काय आहे प्रकरण :

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावाजवळ एका महिला मांत्रिकानं एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना कळविलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी चौकशी केल्यानंतर मंदिर बांधणीच्या नावाखाली महिला मांत्रिकाला सात बळी द्यायचे होते. तिनं दोन महिलांचा बळी दिला असून एका महिलेनं तिच्या तावडीतून सुटका केल्यानं ती बचावल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय.

ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दांडवळ इथल्या काशिनाथ आणि गोविंद दोरे यांची बहीण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष इथं राहते. आपल्याला सुख मिळत नसल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं. तिनं गावातील एका महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी महिला मांत्रिकासमोर व्यथा मांडल्यानंतर तिनं तुझी आई आणि बहीण चेटकीण असल्यानं तुम्हाला सुख लाभत नसून दोघींचा बळी द्यावा लागेल, असं सांगितले. काशिनाथ आणि गोविंद यांनी दिवाळीत त्यांची आई बुधीबाई पुना दोरे आणि बहीण राहीबाई पिंगळे यांना तिच्याकडे आणलं. तिनं दोघींना बेदम मारहाण केली आणि बुधीबाई हिचे डोळे काढले. त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र राहीबाई पिंगळे हिनं प्रसंगावधान राखत पळ काढला. मात्र महिला मांत्रिकानं बुगीबाई वीर हिचा बळी दिल्याचं पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झालंय.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.