Sula Fest साठी साउंड सिस्टीमची परवानगी, दोघ लाचखोर पोलिस अधिकारी ताब्यात

शहरालगत असलेल्या सुला वाईनच्या संगीत कार्यक्रमासाठी  परवानगी मागण्यासाठी गेले असता  २२ हजाराची लाच मागणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. नानासाहेब रामकिशन नागदरे (५२) असे नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव असून, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे (५५) असे दोघा लाचखोरांचे नाव आहे.(Sula Fest)

येत्या शनिवारी सुला वाईन येथे म्युझिक इव्हेंट आहे. त्यासाठी त्यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी लाचखोर नागदरे याने त्यांच्याकडे परवानगीसाठी २५  हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीनंतर २२  हजार ठरले. गुरुवारी तक्रारदार पुन्हा नाशिक तालुका पोलीस ठाण्यात परवानगीसाठी गेले. त्यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष देवरे यानेही ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी दोघा लाचखोरांना २२ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.(Sula Fest)

https://www.facebook.com/NashikOnWeb/
आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Sula Fest साठी साउंड सिस्टीमची परवानगी, दोघ लाचखोर पोलिस अधिकारी ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.