सुखोई विमान अपघातात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकार व एचएएलकडून मदत देणार

छगन भुजबळ यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तरSukhoi help from state government HAL farmers affected accident

नागपूर, निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळलेल्या सुखोई ३० या लढाऊ विमान अपघाताने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकार कडून मदत देण्यात येईल त्याचबरोबर एचएलशी चर्चा करून एचएएलकडून देखील नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सांगितले. मुंबई येथे झालेल्या विमान अपघाताबाबत विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील उपप्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिले.Sukhoi help from state government HAL farmers affected accident

लक्षवेधी सूचनेवरील उपप्रश्नावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, मुंबईत झालेल्या अपघाताप्रमाणे नाशिकच्या निफाड परिसरात एचएएलच्या सुखोई ३० या लढाऊ विमानाचा अपघात झाला. या अपघातात निफाड तालुक्यातील गोरठाण व वावी शिवारातील सुमारे ७.३१ हेक्टर शेती क्षेत्राचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे येथील द्राक्ष, डाळिंब बागांसह इतर शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या विमानाच्या इंधनामुळे देखील येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासर्व शेती पिकाचे पंचनामे झाले आहे. मात्र अद्याप शासनाकडून या शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नसल्याचे भुजबळांनी म्हटले .

ते म्हणाले की, या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्यात यावी. यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून एचएएल प्रशासनासोबत चर्चा करून येथील शेतकऱ्यांची झालेली संपूर्ण नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यसरकार सुखोई विमान अपघातात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारच्या वतीने मदत उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर एचएएल प्रशासनाच्या वरिष्ठांशी यासबंधी चर्चा करून एचएएल कडून देखील येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Sukhoi help from state government HAL farmers affected accident

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.