सुकाणू समिती : चर्चा आणि आंदोलन एकाचवेळी चालू राहणार

मुंबई : सुकाणू सदस्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. यात घेतलेल्या निर्णयानुसार सरकारच्या आमंत्रणानुसार सुकाणू समितीचे​ सदस्य उद्या दुपारी १ वाजता सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत,​ अशी माहिती सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

​शेतकऱ्यांशी चर्चा करायची म्हणून सरकारने आम्हाला आमंत्रित करून सरकारने आम्हाला शेतकरी म्हणून मान्यता दिली आणि त्याचे​ सर्टिफिकेट ​आम्हाला दिले, असा तिरकस​ टोला ​शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्यावेत,​ स्वामीनाथन आयोग लागू करावा,​ सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे​ या मागण्यांवर सुकाणू ठाम असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले. सरकारने मागण्या मान्य कारपर्यंत आंदोलनाची दिशा नाशिकच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच पुढे असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

असे असताना देखील लाइव्ह पत्रकार परिषदेत रघुनाथ दादा पाटील, जयंत पाटील राजू शेट्टी यांच्यात समन्वय नसल्याचे समोर दिसले. रविवारच्या बैठकीला किती सदस्य जातील यावरून हा वाद कॅमेरासमोरच रंगला. जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांनी सांगितलेले १५ सादास्या बैठकीला जातील असे जाहीर केल्यानंतर लगेच रघुनाथ दादांनी याला आक्षेप घेतला. सर्व ३५ सदस्य बैठकीला जातील यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

उद्या​च्या बैठकीनंतर​ होणाऱ्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा काय असणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे​.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.