फळ-भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सत्तेत राहून विरोधक असलेल्या आणि  सरकारकडून एकही काम करवून ण घेवू शकलेल्या  एका पक्षाचा शेतकरी कर्ज मुकीतीचा मेळावा  नुकताच संपन्न झाला. हे मेळावा होवून २४ तास उलटत नाहीत तोच दिंडोरी येथील एका शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. सोसायटी कर्ज फेडू न शकलेल्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

दिंडोरी  तालुक्यातील अंबानेर गावातील गोपाळा कोंडाजी हडस (३०) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन  केले आहे.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले गेले मात्र त्यांची मृत्यू झाला होता. हडस यांनी वैतागून द्राक्ष बाग तोडली होती, तर रोज उत्पन्न मिळेल या हेतूने भाजीपाला पिकवायला सुरुवात केली होती. मात्र भाजीपाला भाव सुद्धा मिळत नव्हता आणि कर्जाची रक्कम सुद्धा फेडली जात नव्हती. त्यांच्यावर  सोसायटीचे २ लाख रु पये कर्ज  होते. त्यांनी कर्जाला कंटाळून या  विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.  संबधित शेतकऱ्याचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पंचनामा करून अहवाल शासनाला पाठविला असल्याची माहिती तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे. तरुण शेतकरी आत्महत्या प्रमाण अचाकन वाढले आहे. या आगोदर अनेक ३०र्षाच्या आतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.तर खरेच मेळावे शेतकरी  वर्गाला धीर देतात की फक्त मते  कसे मिळतील   या करीता हे आंदोलन आहे असाही   प्रश्न निर्माण  होतो.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.