१२वी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, व्ही. एन. नाईक महाविद्यालयात तणाव

नाशिक : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असलेल्या काजल संजय साळवे (वय १८) हिने आत्महत्या केली आहे.

काजलने उडी मारल्याचे लक्षात येताच तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. सरकारवाडा पोलीसांनी लागलीच घटनास्थळी पोहचत पंचनामा सुरु केला आहे. काजलच्या आत्महत्येमागे काय कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करीत आहेत.

महाविद्यालयात तणाव

महाविद्यालयाच्या इमारतीवरून एका मुलीने आत्महत्या केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर महाविद्यालय परिसरात अनेक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस व कॉलेज प्रशासनाने कॉलेज परिसरात ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

नातेवाईकांनी केला घातपाताचा आरोप

काजलच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत याची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याने तणावाचे वातावरण होते. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवैकानी नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत घालत राजी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.