‘उद्योगकुंभ २०१८’ संपन्न :अपयशी माणसाला जग विसरते, यशस्वी माणूस सदैव लक्षात राहतो : सुरेश हावरे

नाशिक : जगाचा इतिहास पाहिला असता उद्योजक असो वा शास्त्रज्ञ जग नेहमीच जो यशस्वी झाला आहे त्यालाच कायम लक्षात ठेवते. त्यामुळेच कधीही चिकाटी सोडलेली नसलेला एडिसन अपयशी ठरल्यानंतरही प्रयत्न सोडत नाही. सतत यश शोधत राहिला. अगदी असाच प्रयत्न आपणही केला तर कोणताही व्यवसाय नक्की यशस्वी करू शकतो असे मत राज्यमंत्री आणि साई संस्थान चे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सॅटेर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित ‘उद्योगकुंभ २०१८’ या एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत व्यक्त केले.successful man always remembers suresh haware nashik news udogkinbh Saturday club   

सदरच्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश हावरे, राज्यमंत्री, अध्यक्ष साई संस्थान, हावरे बिल्डर., श्री.अच्युत गोडबोले प्रसिद्ध आंतराष्ट्रीय आय.टी. तज्ञ तथा प्रसिद्ध लेखक, श्री.नितीन पोद्दार, प्रसिद्ध राष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट लॉयर, कॅप्टन श्री.अमोल यादव मेक इंडिया उपक्रमातील राज्य शासनाचे भागीदार, भावेश भाटीया उद्योजक सनराईज मोल्ड चे संस्थापक, अभिनेता संदीप कुलकर्णी आदी  हे मान्यवर उपस्थित होते.successful man always remembers suresh haware nashik news udogkinbh Saturday club   

शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन, मुंबई आग्रा रोड येथे संपन्न झालेली परिषद  #Change अर्थात ‘बदल’ हे ब्रिद घेऊन पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या हावरे यांनी बोलतांना  उद्योजकतेचे यश विशद केले. यात अनेकजण असे समजतात की पैसे नसतील तर व्यवसाय करता येत नाही. मात्र अनेकदा व्यवसायात इतरांची मदत घ्यावीच लागते. अर्थात पुढे त्याचा विश्वास सार्थक ठरवावा लागतो. त्यामुळे उद्योजकाने काम करतांना मनात कुठलीही भीती ठेऊ नये. याविषयाचे उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की उडणाऱ्या फुग्याचा रंग महत्वाचा नसतो. फुग्यात काय भरलेले आहे यावर फुग्याशी उडण्याची क्षमता ठरते असे त्यांनी सांगितले.

परिषदेच्या सुरुवातीला कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार यांनी मराठी माणूस व्यवसाय करतांना नेहमा कुठे चुकतो यांची बोलकी उदाहरणे दिली. व्यवसाय करतांना अनेकदा  पार्टनर घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे अनेक फायदे होतात. मात्र मराठी माणसाला पार्टनर नकोच असतो. उबर कधी उभी राहिली नसती जर गुगल सोबत पार्टनरशिप केली नसती. त्यामुळे पार्टनर फार महत्वाचा आहे. सोबत काम करतांना त्याच्या अटी आधी ठरवून घ्या. आणि कायम व्यवसायिकता जपा असा गुरु मंत्र दिला.

डीजीसीए उदासीन, विमानासाठी अजूनही एक परवानगी बाकी : अमोल यादव

भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाचे उत्पादन करण्याच्या तयारीत असलेल्या अमोल यादव यांनी नवं उद्योजकाला आपल्या श्वासा एवढीच यशाची गरज वाटायला हवी तरच तो आजच्या घडीला यशस्वी होऊ शकतो असे मात मांडले. वयाच्या १९ व्या वर्षी अमेरिकेत वैमानिकाचे प्रशिक्षण घेत असताना घरून आलेल्या पैशांचा भार पडू नये यासाठी ४ मित्रांसोबत २२००० डॉलरचे विमान खरेदी करण्याची कल्पना सुचली. त्यावेळी बाबांनी स्वतःचा निर्णय घेण्याची शक्ती आत्मसात करवून दिल्याने निर्णय घेतला. विमान घेतल्यानंतर त्यात काम करताना विमानाची बांधणी कशी असते ते कळले. त्यावेळी आपण विमान बनवू शकतो ही बाब सोपी वाटली मात्र ते भारतात बनविण्याबाबत मात्र खरे आव्हान असल्याचे जाणवले.successful man always remembers suresh haware nashik news udogkinbh Saturday club   
यादव पुढे म्हणाले की, शक्तिमान बाईकचे ११० एचपीचे इंजिन वापरून पाहिले विमान बनविण्यासाठी सुरुवात केली. फूटपाथ वरील पुस्तके वाचून संशोधन पूर्ण केली. या दरम्यान २००९ ते २०१७ पर्यंत सध्याची नोकरी जाण्याची भीती असताना डीजीसीए या हवाई वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थेशी झालेल्या संघर्षाची कथा सांगताना यादव यांनी ‘don’t quite’ या मंत्रासह प्रयत्न केल्यास यश आपलेच असल्याची शास्वती नवं उद्योजकांना दिली. successful man always remembers suresh haware nashik news udogkinbh Saturday club   
डिजीसीएशी आरटीआयच्या माध्यमातून लढायचे ठरविल्यानंतर सतत त्यांच्या चुका त्यांना समजावण्याचा यश येत असताना मीडियाने यास वाचा फोडल्या नंतर २०१७ मध्ये पहिली परवानगी मिळाली. मुख्यमंत्र्यांनी चांगली साथ दिली असताना देखील आज अखेरची परवानगी बाकी असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास लवकरच भारतीय बनावटीचे पाहिले विमान आकाशात उडेल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
त्याच बरोबर महाराष्ट्रात असलेली प्रादेशिक हवाई सेवेबद्दल असलेली अनास्था त्यांनी उघडी पडताना  गुजरातमध्ये ३३ कार्यरत विमानतळाच्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ ४ ऑपरेटिंग विमानतळे होती. मात्र आता महाराष्ट्रात प्रत्येक शहरात विमानतळ हवे आहे. लहान विमानातून सामान्य प्रवासी वाहतूक सुरू करावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पहिले चर्चासत्र : सहभाग :  श्री.पियुष सोमाणी क्लाऊड सर्विसेस, सुधीर मुतालिक ऑईल आणि एनर्जी तज्ञ, श्रीकृष्ण गांगुर्डे करार पद्धतीने कुकूटपालन निर्माते यांच्याशी अजित मराठे यांनी चर्चा केली.

अभिनेते निर्माते संदीप कुलकर्णी उद्योगात बदल घडणे गरजेचे आहे. चित्रपट मनोरंजन क्षेत्रांत जर तूम्ही कॉन्टेन्ट दिला नाही तर व्यवसाय करता येणार नाही. अनेक निर्माते एक चित्रपट फसला की बाहेर जातात. मात्र मी आता अनेक निर्माते एकत्र करत नवीन कल्पनेवर चित्रपट निर्मिती करत असल्याचे सांगितले. 

परिषदेसाठी उपस्थित उद्योजक :

आगामी दिवस ‘जुगाड’चे : अच्युत गोडबोले

मागील 10 वर्षात गणिताच्या किती तरी पटीने तंत्रज्ञान आले आहे. जर तुम्ही ते तंत्र शिकले नाहीत तर तुम्ही संपणार आहात. कंप्युटर शिवाय जगणे अशक्य आहे ज्यांनी कंप्युटर आले तेव्हा बदल केले नाही ते संपून गेले आहेत असे त्यांनी सांगितले आहे. सर्व क्षेत्रात फार मोठे बदल होतो हा बदल सर्वात आधी अमेरिकीन लोकांना लगेच कळतो त्यांनी आयटी लगेच अवगत केलें त्यामुळे तेथे फार मोठा बदल घडला आणि जगावर परिणाम झाला. काम बदलणे म्हणजे काम बदल नाही तर कौशल्य शिकने हे होय. जाहिरात बदलत आहेत. सर्व व्यवहार आता ई स्वरूपात होत असून अनेक जॉब बंद होत असून त्यामुळे बदलाला तयार रहावे लागणार आहे. ऑफिस येत्या काळात मोठे बदल होऊन ते म्युझिअम होणार आहेत. बदल फार मोठे आहेत. आयटीत तर कॉप्युटर आता नॅनो कंप्युटर निर्माण होतील.

बायोलॉजिकल बदल फार मोठ्या प्रमाणात होत असून जीनोम वर मोठे संशोधन होत असून जीन्स आपल्या कळत असून ते काही शतकांच्या नंतर आयुष्यमाणात मोठे वाढणार आहे. जी कंपनी बदल करत नाही ती कंपनी बंद होईल जसे नोकिया.याहू.कोड्याक हे दिवाळ खोरीत गेला आहे. आता इ बुकिंग मुळे जुने ट्रॅव्हल कंपनी बंद झाल्या आहेत. पुस्तकांची दुकानं बंद झाली असून सर्व ई व्यवहार होतो. ओला ओबर ने तर वाहतूक विश्व बदलून गेले आहेत. संपूर्ण व्यवसाईक मॉडेल आता बदलत असून मधले दलाल पूर्ण संपलं. आर्टिफिशल इंटिलीजन्स आता बदलत असून त्याद्वारे भाषा शिकत असून ते 95 टक्के भाषा व्यकरण सह बोलत तात तर दोन भाषांतील अंतर कमी होत आहेत. दर दहा वर्षात बदल अचूकपणे टिपा तर तुम्ही टाकाल.   याबाबद तुम्हल रिसर्च करावा लागणार असून त्यातून मार्ग सापडणार आहे. तुम्हाला जुगाड शिकवा लागणार आहे त्यातून तुम्ही शिकणार आहेत. सुझुलोन आणि मिट्ट कुल या बदल होऊन मोठ्या झाले आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी क्लब तर्फे संजय मोरे रिजनल सेक्रेटरी, महेश सावरीकर अध्यक्ष नाशिक, संदीप सोमवंशी, मधुरा  क्षेमकल्यानी, अमोल कासार अध्यक्ष सिन्नर विभाग, प्रवीण काकड नाशिक 1 विभाग अध्यक्ष, समीर शहा अध्यक्ष संगमनेर विभाग, पराग मनोहर, तुषार पाटील, संजय शिंदे, झाकीर मन्सुरी आदी सदस्य परिषदेसाठी उपस्थित होते.

successful man always remembers suresh haware nashik news udogkinbh Saturday club   

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.