नाशकात ‘डोम’मध्ये होणारी भारतातील पहिली खो-खो स्पर्धा

खेळाडू होणार स्वच्छतादूत, गोदावारीची करणार आरती​, खेळ आणि विज्ञानाचे नाते होणार घट्ट

नाशिक : नाशिक महानगर पालिका आणि नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सबज्युनिअर खो खो स्पर्धा आयोजित आहे. नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे २४ ते २८ मे दरम्यान होणार आहे. ​ स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व​ नाशिकच्या साक्षी कारे हिच्याकडे आहे. तर कुमार संघात नाशिकचा चंदू चावरे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.

मातीतल्या खेळांना सुगीचे दिवस येताना दिसत असून नाशिक जिल्हा खो खो संघटनेच्या प्रयत्नातून भारतात प्रथमच एखादी खो खो स्पर्धा तात्पुरत्या उभारलेल्या भव्य अशा डोम मध्ये होत आहे. यामुळे खेळाडूंना उन्ह व मैदानाला अवकाळी पावसाचा त्रास होणार नाही ​ असे प्रयोजन आहे​. ​स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून १००० पेक्षा जास्त लोक बसू शकतील एवढी प्रेक्षक गलरी उभारण्यात येणार आहे.​

२४ मे रोजी ​छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे होणाऱ्या या स्पर्धेचे ​ उदघाटन पालकमंत्री गिरीश महाजन, माजी उपमुख्यमंत्री तथा राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी भारतीय खो-खो महासंघाचे सचिव सुरेश शर्मा, संयुक्त सचिव रामदास धरणे, नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ​

​या स्पर्धेत ३३ राज्यांचे ​६०​ संघ ​सहभागी होणार असून सलग ५ दिवस सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात ४ तास खेळ होणार आहे. एकूण ​८४०​ खेळाडू ​ आणि संघ व्यवस्थापन अश्या ९८० जणांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था हॉटेल मध्ये जिल्हा संघटनेने केली असल्याची माहिती राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उमेश आटवणे, आनंद खरे आदी उपस्थित होते. ​​

या स्पर्धेची वैशिष्ट्ये :

डोममध्ये होणार स्पर्धा

भारतात पहिल्यांदाच असा प्रयत्न भारतात मैदानी खेळ असलेला खो खो पहिल्यांदाच डोम मध्ये भरविण्यात येणार आहे. शिवाजी स्टेडीयम वर उभारण्यात आलेल्या २१०*९० फुटाच्या या डोम मध्ये दोन्ही मैदाने कव्हर करण्यात आली आहेत. उन्हाचा त्रास आणि अवकाळी पाउस यांचा त्रास टाळून ही स्पर्धा आता होणार आहे. त्याचप्रमाणे प्रो-कबड्डी प्रमाणे खो खो बाबतही वातावरण निर्मिती करता यावी यासाठी प्रायोगिक तत्वावर आयोजन असल्याचे दिसून येत आहे.

खो-खो खेळाडू होणार स्वच्छतेचे दूत

दि. २३ मे रोजी सर्व ​खेळाडूंच्या हस्ते​ गोदामाईची आरती ​ करण्यात येणार​ ​ असून​ ​सर्व खेळाडू स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. स्पर्धा सुरु झाल्यापासून सहभागी झालेले सर्व खेळाडू आपापल्या गावांचे स्वच्छतादूत म्हणून काम करणार आहेत.

खेळ आणि विज्ञानाचे नाते घट्ट करण्याचा प्रयत्न

प्रत्येक खेळ हा विज्ञानावर आधारित आहे. या स्पर्धेत​ ​खेळाचे आणि ​ विज्ञाना ​चे नाते सांगणारी​ थीम ​ तयार करण्यात आली असून खेळाडूंच्या बुद्धीला चालना देणारे विज्ञान विषयक खेळ उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना हे खेळ भेट म्हणून देण्यात येणार आहेत. विज्ञानाशी नाते जो डले गेल्यानंतर अंधश्रद्धा आपोआपच दुर्लक्षित होईल ​ असा यामागील उद्देश आहे​.

नाशिक खेळ क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी : नाशिक स्पोर्ट्स

नाशिक शहरातील बातम्या त्वरित मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा… NashikOnWeb FaceBook

Follow Us On Twitter : NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.