विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले एक ठार, दुसरा गंभीर

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोड येथील असलेल्या संदिप फाऊंडेशनच्या दोन विद्यार्थ्यांना आज पहाटे अज्ञात वाहनाने चिरडले आहे. या भीषण अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला आणि दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. महिरावणीजवळ पहाटे हा अपघात घडला आहे. या अपघातात  मयूर पाटील (रा. चोपडा) हा विद्यार्थी ठार तर त्याचा मित्र किरण माळी हा गंभीर जखमी झाला. या तील जखमी किरणला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दोघे या परिसरात महिरावणी गावात रूम करून राहत होते.दोघे पुणे येथे फिरण्यासाठी निघाले होते. सकाळी ही घटना उघड झाली असून त्र्यंबकेश्वर पोलिस पुढील तपास करत आहेत.या रस्त्यावर अनेक गावे आहेत.गावातील नागरिक या भागातून दुचाकीवर प्रवास करत्तात. येथे शिक्षण संस्था किंवा गावात जाण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी रस्त्यावर कोठेही गतिरोधक नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.