भिकाऱ्यांचे भांडण, वार झाल्याने एकाचा मृत्यू

गंगाघाटावर घडली घटना, अंमली पदार्थांचे सेवन बेतले जीवावर

पंचवटी : रामकुंड परिसरात दोन भिक्षुकांमध्ये हाणामारी झाली. यात धारदार चाकूने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

गंगाघाट परिसरात भिक्षुकी वरून जीवन जगणारे अनेक भिक्षुकी आहेत. ते नेहमीच अंमली पदार्थांच्या नशेत असल्याचे दिसून येते. याप्रकरणात मृत अरुण भामरे (वय ६०) व अनिल आपटे हे रामकुंड परिसरात बसले असताना त्यांच्यात वाद झाले. पुढे याचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि अनिल आपटे या संशयिताने मृत भामरे यांच्या पायावर धारदार चाकूने वार केला.

वार झाल्यानंतर काहीकाळ भामरे तसेच पडून राहिले आणि बेशुद्ध अवस्थेत गेले. परिसरातील नागरिकांना हे लक्षात येताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात भामरेंना दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली होती मात्र मृताच्या पायातून मोठ्याप्रमाणात रक्तश्राव झाला असल्याचे वैद्यकित तपासणीत समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपटे याला अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पीपी मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.