समर्थकांना राजकीय भेटीगाठी थांबवण्याच्या छगन भुजबळांच्या सूचना

पंकज भुजबळ यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन stop political meetings chhagan bhujbal suggests supporters

मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पंकज भुजबळ यांची त्यांच्याशी भेट झाली. stop political meetings chhagan bhujbal suggests supporters

यावेळी छगन भुजबळ यांनी पंकज भुजबळ यांना सांगितले की, भुजबळ समर्थक जोडो अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अन्याय पे चर्चा कार्यक्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत आहे.

मात्र यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, कार्यकर्त्यांनी भावनाप्रधान न होता संयम बाळगावा आणि सहानुभूतीपोटी चालविलेल्या राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी थांबवाव्या. आपला न्यायालयीन प्रक्रियेवर आणि माननीय न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे.

न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी भावनिक न होता संयम बाळगावा आणि आपले सामाजिक कार्य अखंड सुरु ठेवावे अशा सुचना त्यांनी पंकज भुजबळ यांना केल्या.

त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ.पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

***************************************************************************

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर माहिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर माहिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.