नराधम सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर १० वर्ष अत्याचार  

नाशिक : सावत्र बापाने त्याच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नाशिकरोड येथील टागोरनगरमध्ये घडली आहे़. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्यादीवरुन ३८ वर्षीय सावत्र बापाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. stepfather rape minor daughter tortured 10 years nashik news 

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार हा तिचा दुसरा पती आहे. सर्व मिळून टागोरनगरमधील एका सोसायटीत राहत होते.  या प्रकरणी जेव्हा ही महिला नोकरीस जात असे तेव्हा  २००९ ते ७ ऑगस्ट २०१८ वर्षातील कालवधीत अल्पवयीन मुलगी घरात एकटीच राहत असतांना, मुलगी पाचवीत असल्यापासून हा सावत्र बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता़.  तसेच या मुलीला याबाबत वाच्यता केली तर मारण्याची धमकी देत होता. stepfather rape minor daughter tortured 10 years nashik news 

पोलिसांनी पिडीत मुलीच्या सावत्र बापाविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे़. या गंभीर प्रकरणी परिसरात संताप व्यक्त होत असून या नराधम बापास कडक शिक्षा करावी कशी मागणी नागरिक करत आहेत.

( मुलीची आणि तिच्या आईची ओळख समजू नये या कायद्यानुसार नराधम पित्याचे नाव उघड करू शकत नाही)

stepfather rape minor daughter tortured 10 years nashik news 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.