राज्य बॅडमिंटन : सब ज्युनिअर निवडचाचणी स्पर्धेचे  ​नाशिकमध्ये​  आयोजन

नाशिक : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सब ज्युनिअर राज्य निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे 16 ते 20 जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार असून 28 जिल्ह्यातील 914 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ​ स्पर्धेत बाद पद्धतीने हे सामने होणार असल्याने सुरुवातीपासूनच चुरस बघायला मिळणार आहे.जून महिन्यात मुलुंड (मुंबई) पहिल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीनाशिक मध्ये होत आहे तर ​ तिसरी
स्पर्धा नागपूर येथे ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या स्पर्धांतील कामगिरीच्या आधारावर बॅडमिंटनपटूंची महाराष्ट्र राज्याच्या संघात वर्णी लागणार आहे.state sub junior badminton tournament 2018 organize nashik city

या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून तब्बल 144 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात झालेल्या स्पर्धांपैकी स्थानिक स्तरावर क्वचितच अशी मोठया प्रमाणात नोंदणी होते. एवढ्या मोठ्या संख्येने झालेली नोंदणी ही नाशिकमध्ये सुरू असलेल्या जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या प्रामाणिक प्रयत्नांची पावती  आहे.​
मुलुंड येथे झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणे याने दुहेरी सुवर्ण कामगिरी नाशिकच्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. ​. स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून 20 पंच​   काम करणार असून स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  विवेक सराफ (पुणे) हे काम बघणार आहेत. तर नाशिकचे पराग एकांडे उपमुख्य पंच म्हणून असतील.state sub junior badminton tournament 2018 organize nashik city

स्पर्धेत अनेक मानांकित खेळाडू सहभागी होणार असून त्यात 13 वर्षाखालील मुलांमध्ये प्रज्वल सोनवणे (नाशिक), ओम गवंडी (ठाणे), अद्या पारसनीस (पुणे), पार्थ देवरे (नाशिक), 13 वर्षाखालील मुलींमध्ये अलीशा नाईक, तनिका सिक्युरिया (मुबई उपनगरीय), आर्या कोरगावकर (ठाणे), मधूमिता नारायण (ठाणे), हेतल विश्वकर्मा, वरदा एकांडे, श्रावणी वाळेकर, नंदिनी भार्गवा (नाशिक), 15 वर्षाखालील मुलांमध्ये सार्थक पाखमोडे (नागपूर), ध्रुव ठाकोरे (पुणे), सिद्धार्थ बावनकर (नागपूर), अथर्व जोशी (मुंबई उपनगरीय) तर 15 वर्षाखालील मुलींमध्ये रिया हब्बू (पुणे), ऋचा सावंत (पुणे), अदिती राव (ठाणे), अदिती साधनकर (नागपूर) या  ​ मानांकित खेळाडूंचा​ ​ समावेश आहे.state sub junior badminton tournament 2018 organize nashik city

ही स्पर्धा 13 वर्षाखालील मुले-मुली एकेरी आणि दुहेरी तसेच 15 वर्षाखालील मुले-मुली एकेरी आणि दुहेरी अशा आठ गटांत होत असून लहान मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 10 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी एकेरी गटातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण 972 सामने होणार ​आहेत.

नाशिक शहरात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होत असून सर्व खेळाडूंचे पालक आणि नाशिककरांनी जास्तीतजास्त संख्येने सामने बघण्यासाठी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राध्येश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगेश एकबोटे, समीर रहाळकर, चंदन जाधव, संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ. शर्मिला कुलकर्णी, डॉ. शिक्षिता बच्छाव, आदी प्रयत्न करत आहेत.
अधिक माहितीसाठी :
योगेश्वर कोठावदे : 9970856005
​योगेश एकबोटे (NDBA Member): ​8888884370
​अनंत जोशी (NDBA Secretary):​ 9881151060
state sub junior badminton tournament 2018 organize nashik city
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.